भारतामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहन वापराकडे आता नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे.
या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कार तसेच बाईक यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून बऱ्याच व्यक्तींकडे आता इलेक्ट्रिक वाहने आहेत. या दृष्टिकोनातून या वाहनांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकून राहावी याकरिता यांची विशेष काळजी घेणे देखील गरजेचे असते.
जेणेकरून दीर्घकाळ सेवा आपल्याला मिळू शकेल व इतर मेंटेनन्स चा खर्च देखील वाचेल. याच दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण पावसाळ्यामध्ये या वाहनांची काळजी कशी घ्यावी? इत्यादी बद्दल माहिती घेणार आहोत.
पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने घ्या इलेक्ट्रिक वाहनांची काळजी
1- बॅटरीची काळजी घेणे गरजेचे- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी हा घटक महत्त्वाचा असून पावसाळ्यामध्ये बॅटरी चे कार्य व्यवस्थित चालावे याकरिता बॅटरी पॅक व बॅटरीचे कनेक्शन योग्य प्रमाणे सीलबंद असणे आवश्यक आहे.
जेणेकरून कोणत्याही प्रकारे बॅटरी पर्यंत पाणी पोहोचणार नाही किंवा पाण्याची गळती बॅटरीच्या काही पार्ट्स पर्यंत होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जर बॅटरी पर्यंत पाणी पोहोचले असेल तर त्याची पटकन दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
2- चार्जिंग करताना घ्या विशेष काळजी- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करताना बॅटरीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
समजा पाऊस सुरू असेल तर बॅटरी चार्जिंग करताना ती कोरड्या जागेत करावी किंवा व्यवस्थित झाकता येईल अशा स्थितीत ठेवून चार्जिंग करणे गरजेचे आहे. तसेच चार्जिंग करण्याकरिता प्लग इन करण्यापूर्वी शॉर्टसर्किट होऊ नये याकरिता प्लग कोरडा आहे की नाही याची काळजी घ्यावी.
3- पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहन चालवताना घ्या विशेष काळजी- पावसाळ्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन चालवत असताना काही बाबींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जसे की खड्डे किंवा पाणी साचलेले असेल अशा ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चालवणे टाळणे गरजेचे आहे. तसेच जास्त वेळेपर्यंत कमी बॅटरी चार्ज असेल तर इलेक्ट्रिक वाहन चालवू नये.
4- वाहनांचे नुकसान झाले तरी विमा करेल तुमची मदत-
इलेक्ट्रिक वाहन असो किंवा कुठलेही वाहन त्याचा विमा काढणे खूप महत्त्वाचे आहे. खास करून इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत आर्थिक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून विमा काढणे महत्त्वाचे असून एखाद्या प्रसंगी जर इलेक्ट्रिक वाहनाला आग लागली किंवा काही कारणास्तव अपघात झाला तर तुम्हाला आर्थिक मदत मिळणे या माध्यमातून शक्य होते.5- वाहनांची स्वच्छता महत्त्वाची- पावसाळ्यामध्ये तुम्ही कुठून आल्यानंतर वाहनाचे साफसफाई करणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनावर चिखल असेल तर तो काढून टाकणे महत्वाचे असून वारंवार जर चिखल साचत असेल व तो काढला नाही किंवा स्वच्छ केला नाही तर इलेक्ट्रिक वाहनाच्या बाहेरील कोणत्याही भागाला यामुळे इजा होऊ शकते.
6- खोल पाण्यात जाणे टाळावे- महत्वाचे म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जी काही सिस्टम वापरलेली असते ती खूप संवेदनशील असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनाला एखाद्या खोल पाण्यातून किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या महत्त्वाच्या भागापर्यंत पाणी पोहोचेल अशा ठिकाणाहून वाहन काढणे खूप धोकादायक असते.
तसेच नदी किंवा पुलावरून प्रवाह वाहत असल्यास वाहन नेऊ नये. यामुळे पाणी बॅटरी पॅकला लागले तर काहीतरी बिघाड होण्याची शक्यता वाढते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात तेव्हा बॅटरी पॅक सह त्याचे इंग्रेस प्रोटेक्शन रेटिंग आणि आयपी 67 रेटिंग तपासणे गरजेचे आहे.