ऑटोमोबाईल

सगळ्यांची आवडती होंडा एक्टिवा-125 नव्या रूपात लॉन्च! देण्यात आली आहेत भन्नाट फीचर्स आणि मायलेज आहे उत्तम

Honda Activa- 125 Scooter:- गेल्या काही दिवसांपासून जर आपण भारतीय वाहन बाजारपेठेमध्ये बघितले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स तसेच स्कूटर्स व बाईक लॉन्च करण्यात येत आहेत व यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश आहे.

स्कूटरच्या बाबतीत बघितले तर नामवंत अशा कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आलेल्या आहेत व त्यासोबत बाईक्स देखील लॉन्च करण्यात आलेले आहेत व त्यासोबत पेट्रोल व्हेरियंट देखील लाँच केले गेले आहेत.

या स्कूटरमध्ये जर आपण बघितले तर होंडाची एक्टिवा स्कूटर सगळ्यांच्या पसंतीची व ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली स्कूटर आहे. आता हीच होंडाची एक्टिवा एका नव्या रूपात लॉन्च करण्यात आली असून यामध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत व विशेष म्हणजे ही नवीन होंडा एक्टिवा 125 DLX आणि H-Smart अशा दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे व यामध्ये आता नवीन कलर ऑप्शन देखील देण्यात आला आहे.

होंडाची एक्टिवा आली आता नवीन रूपात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशातील अग्रगण्य आणि प्रसिद्ध असलेल्या होंडा या टू व्हीलर कंपनीने त्यांची प्रसिद्ध असलेली एक्टिवा नव्या रूपात लॉन्च केली असून ही अपडेटेड एक्टिवा-125 डीएलएक्स आणि एच स्मार्ट अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नवीन होंडा एक्टिवा 125 मध्ये आता अनेक अपडेट करण्यात आले आहेत.

यामध्ये एक कन्ट्रास्टिंग ब्राऊन सीट देण्यात आले आहे व इतर पॅनलसाठी एकाच कलरची थीम देण्यात आली आहे.विशेष म्हणजे आता या नवीन होंडा एक्टिवा 125 मध्ये तब्बल सहा कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. तसेच इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये प्रमुख बदल करण्यात आला आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 4.2 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे.

या माध्यमातून कॉल आणि मेसेजसाठी नेव्हिगेशन आणि अलर्ट सारखे फंक्शन देखील देण्यात आले आहेत. तसेच या नवीन ऍक्टिवा 125 स्कूटरमध्ये टाईप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आले असल्याने तुम्हाला डिवाइस चार्ज करणे देखील शक्य होणार आहे.

कसे आहे या नवीन ऍक्टिवाचे इंजिन?
होंडा कंपनीने या नवीन एक्टिवा स्कूटरच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये 123.9cc सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन दिले आहे व सीव्हीटी गिअरबॉक्सच्या मदतीने हे इंजिन ८.३ बीएचपी पावर आणि 10.5 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.या इंजिनमध्ये आइडलिंग स्टार्ट आणि स्टॉप फीचर्स देण्यात आले आहे.

कसे असणार मायलेज?
होंडा कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन होंडा एक्टिवा 125 स्कूटरचे जर मायलेज बघितले तर याबाबत कंपनीने दावा केला आहे की शहरी भागामध्ये ही स्कूटर 52.63 किलोमीटर पर लिटर आणि महामार्गावर ६६.८ किलोमीटर परलिटर इतके मायलेज देण्यास सक्षम आहे.

किती आहे किंमत?
होंडा टू व्हीलर इंडियाने लॉन्च केलेल्या या अपडेटेड ऍक्टिवा 125 स्कूटरची एक्स शोरूम किंमत 94 हजार 422 रुपयांपासून सुरू होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts