Honda Activa Electric Scooter:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाईक्स आणि कार इत्यादींच्या मागणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्या जात असून वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून देखील आता अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उत्पादित करण्यात आल्या असून त्या बाजारपेठेत विक्री करिता लॉन्च देखील करण्यात आले आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटर च्या बाबतीत जर बघितले तर एक महत्त्वाची बातमी समोर येत असून भारतात प्रसिद्ध असलेली होंडा कंपनीची एक्टिवा आता इलेक्ट्रिक स्वरूपात येणार असून लवकरच एक्टिवाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत कंपनी आहे.
या महिन्याच्या अखेरपर्यंत इलेक्ट्रिक ऍक्टिवा लॉन्च होणार असून ही स्कूटर लॉन्च होण्यापूर्वी कंपनीच्या माध्यमातून तिचा एक टिझर पोस्ट करण्यात आला आहे. यावरून आपल्याला होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटरचा काही तपशील मिळू शकतो.
काय आहे होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटरच्या टीझरमध्ये?
होंडा कंपनीच्या माध्यमातून एक्टिवा इलेक्ट्रिकने एक प्रदर्शित केलेल्या टिझरमध्ये आपल्याला पाहता येते की यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार असून जे फीचर आणि कनेक्टिव्हिटीला हायलाईट करते.
तसेच टीझरमध्ये असेही पाहायला मिळाले आहे की, येणारी होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक अनेक डिस्प्ले पर्याय सह येणार असून यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल डिस्प्ले देखील पाहायला मिळाले आहेत.होंडा कंपनी ही दुचाकी बाजारपेठेतील एक मोठे नाव असून इलेक्ट्रिक स्कूटर विभागामध्ये मात्र या कंपनीने थोडा उशिराच प्रवेश केला आहे.
परंतु आता या नवीन मॉडेलमध्ये विश्वासाहार्य ऍक्टिवा नाव वापरल्यास चांगली वैशिष्ट्ये तसेच स्टायलिश डिझाईन आणि स्पर्धात्मक किंमत जर दिली तर ही एक्टिवा बाजारातील प्रतिष्ठेमुळे प्रसिद्ध असलेल्या इतर स्पर्धकांना देखील तगडी टक्कर देऊ शकते.
किती असू शकते किंमत?
प्राप्त झालेल्या माहितीनुसार होंडा इलेक्ट्रिक ऍक्टिवाच्या प्रोडक्शन करिता गुजरात आणि कर्नाटकमध्ये एक वेगळा सेटअप तयार केला आहे व या माध्यमातून वेटिंग पिरियड कमीत ठेवता येईल असा कंपनीचा प्रयत्न आहे.
कंपनीने या होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती बाबत अजून कुठलाही प्रकारचा खुलासा मात्र केलेला नाही. परंतु जर एक अंदाज पकडला तर एक लाख रुपयांच्या एक्स शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत ही इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर केली जाऊ शकते.