भारतामध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या सणासुदीच्या कालावधीत नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या अनेक कार लॉन्च करण्यात येत आहेत व यामध्ये भारतातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी देखील मागे नाही. मारुती सुझुकीच्या माध्यमातून देखील अनेक कार लॉन्च करण्यात आले आहेत व काही कारचे अपडेटेड व्हर्जन बाजारामध्ये सादर करण्यात आलेले आहे.
याच पद्धतीने जर आपण बघितले तर मारुती सुझुकी वॅगनार ने देखील एक छानसे मॉडेल देशातील परवडणाऱ्या चार विलर खरेदीदारांची पहिली पसंती आता लॉन्च करण्यात आली असून ती Waltz एडिशन आहे व यामध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आलेले असून अनेक नवनवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. मारुती सुझुकीने ही एडिशन WagonR LXI, VXI आणि ZXI सारख्या तीन प्रकारांमध्ये सादर केली असून यामध्ये 1.0 लिटर आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिनचे पर्याय देण्यात आलेले आहेत.
WagonR Waltz चा बदलण्यात आला आहे लुक
मारुती सुझुकी वॅगनआर देशातील सर्वाधिक विकली जाणारी हॅचबँक असून ती त्याच्या चांगल्या लूक वैशिष्ट्यांसाठी आणि परवडणाऱ्या किमतीत जबरदस्त मायलेजसाठी ओळखली जाते.
मारुती वॅगनआर वॉल्टझ एडिशन मध्ये इतर मॉडेलच्या तुलनेत भरपूर काही देण्यात आले असून यामध्ये तुम्हाला क्रोम फ्रंट ग्रील आणि फॉग लॅम्प असेंबली दिसेल. ज्यामध्ये गार्निश तसेच बंपर प्रोटेक्टर देण्यात आलेले आहेत. तसेच व्हिल आर्च क्लिट्स, बॉडी साईड मोल्डिंग आणि साईड स्कर्टसही दिसतात.
काय देण्यात आली आहेत नवीन वैशिष्ट्ये?
मारुती सुझुकी वॅगनआर वॉल्टझ एडिशन मध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत व यामध्ये नवीन फ्लॉवर मॅट्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा,6.2 इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल एअर बॅग, इबिडी सह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि हिल होल्ड कंट्रोल ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तसेच या कारच्या इंजिनमध्ये ड्युअल जेट, कुल्ड ईजीआर, ड्युअल व्हीव्हीटी आणि आयडल स्टार्ट- स्टॉप तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान केवळ मायलेज वाढवत नाही तर कार्बन उत्सर्जन देखील कमी करते.