Mahindra 9-seater SUV : सध्या देशभरात ७ सीटर कारची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता महिंद्राने आपली 9 सीटर बोलेरो निओ प्लस लॉन्च केली आहे. भारतातील मोठे कुटुंब पाहता महिंद्राने ही 9 सीटर SUV लॉन्च केली आहे.
कंपनीने या SUVची सुरुवातीची किंमत 11.39 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीने ते P4, P10 आणि Ambulance या 3 प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे. P4 आणि P10 दोन्ही 9-सीटर प्रकार आहेत. हे तीन प्रकार फक्त डिझेल इंजिनसह येतील. यात 2.2 लीटर mHawk डिझेल इंजिन आहे, जे रियर-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्ससह येते. अधिक प्रवाशांसह, तुम्ही या एसयूव्हीमध्ये मोठ्या आरामात लांबचा प्रवास करू शकाल.
बोलेरो निओच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, ते खूपच आकर्षक आहे. कपंनीने लूक सुधारण्यासाठी हेडलॅम्प, फॉग लॅम्प आणि मस्क्युलर साइड आणि रिअर फूटस्टेप्समध्ये बदल केले आहेत. यात इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ORVM, पुढील आणि मागील पॉवर विंडो आणि पुरेशी बूट स्पेस यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. यात 2-3-4 पॅटर्नमध्ये आसनव्यवस्था आहे. यामध्ये पुढच्या 2 सीटवर 2 प्रवासी, दुसऱ्या रांगेत 3 आणि मागील 2 सीटवर प्रत्येकी 2 प्रवासी बसू शकतात. सीट फोल्ड केल्यावर त्याला मोठी बूट स्पेस मिळते. एकूणच त्याचे रूपांतर मालवाहू वाहनात होते.
बोलेरो निओ इंटीरियर आणि वैशिष्ट्ये
बोलेरो निओच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचे प्रीमियम इटालियन इंटीरियर, जे उच्च दर्जाचे आहे. यात 22.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ही प्रणाली ब्लूटूथ, यूएसबी आणि ऑक्स कनेक्टिव्हिटीसह येते. एकंदरीत आत बसलेल्या लोकांना पुरेपूर करमणूक मिळते. सर्व प्रवाशांना पुरेसा थंडावा मिळावा यासाठी अनेक ठिकाणी एसी विंग्सही देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी, या SUV मध्ये EBD सह ABS, ड्युअल एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट, इंजिन इमोबिलायझर आणि ऑटोमॅटिक डोअर लॉक सारखी वैशिष्ट्ये आहेत.