ऑटोमोबाईल

कमीत कमी किमतीमध्ये घ्या इलेक्ट्रिक स्कूटर! Ather Ritza वर मिळत आहे बंपर सूट; जाणून घ्या कुठे आहे ही संधी?

4 weeks ago

Ather Ritza Electric Scooter:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आणि त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत असून त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो. भारतीय वाहन बाजारपेठेमध्ये विविध कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशा इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आल्यामुळे ग्राहकांना देखील अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.

परंतु जर आपण इलेक्ट्रिक स्कूटरची किमती बघितल्या तर जास्त असल्यामुळे प्रत्येकाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. कारण बऱ्याच इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ही एक लाखाच्या पुढे असल्याने आर्थिक दृष्ट्या बऱ्याच जणांना परवडत नसल्याने इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही.

अशाप्रकारे तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची आहे. परंतु जास्त किमतीमुळे किंवा आर्थिक बजेट नसल्याने तुम्हाला ते शक्य होत नसेल तर आता एक उत्तम संधी फ्लिपकार्टच्या माध्यमातून चालून आली आहे.

या माध्यमातून तुम्ही प्रसिद्ध असलेली इलेक्ट्रिक वाहन निर्माता एथर एनर्जी या कंपनीची एथर रिझ्टा ई स्कूटर खरेदी करू शकतात. कारण फ्लिपकार्टच्या माध्यमातून या इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर अशी सूट देण्यात येत आहे.

फ्लिपकार्ट इयर एंड सेलच्या माध्यमातून एथर रिझ्टा इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे आकर्षक सूट
एथर एनर्जी या इलेक्ट्रिक वाहन कंपनीची ही स्कूटर एक प्रसिद्ध अशी इलेक्ट्रिक स्कूटर असून या स्कूटरची किंमत साधारणपणे एक लाख दहा हजार रुपयापासून सुरू होते व एक लाख 47 हजार रुपये एक्स शोरूम इतकी आहे.

सध्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून या स्कूटरवर आकर्षक ऑफर देण्यात येत असून एन्ट्री लेवल रिझ्टा एस इलेक्ट्रिक स्कूटर एक लाख 5 हजार रुपये पेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करणे शक्य आहे.

सध्या फ्लिपकार्ट पाच हजार रुपये पेक्षा जास्त विक्रीवर पंचवीसशे रुपयांची सूट देत असून त्यासोबत ईएमआय पर्याय देखील देत आहे व क्रेडिट कार्डवर आठ हजार पाचशे रुपये पर्यंत सूट देत आहे. म्हणजे असे मिळून जवळपास 11 हजार रुपयांची सूट या इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर मिळत आहे.

काय आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये?
एथर रिझ्टा एस हे मॉडेल 2.9 kWh च्या बॅटरीद्वारे काम करते व ती 5.7 बीएचपी पावर आणि 22 एनएमचा टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रिक स्कूटरची 80 किलोमीटर प्रतितास अधिक वेगाने पोहोचू शकते आणि 4.7 सेकंदामध्ये 0-40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते.

इतकेच नाही तर 123 किलोमीटरच्या आयडीसी रेंजबरोबर ही स्कूटर आठ तास आणि तीस मिनिटांमध्ये पूर्ण प्रकारे चार्ज होते. तसेच या स्कूटरला शून्य ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सात तास 30 मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेवीगेशन सोबत सात इंचीचा डिस्प्ले लेन्स देण्यात आला आहे.

तसेच एथर रिझ्टा एस मध्ये 34 लिटरचा मोठा अंडर सीट बूट देण्यात आला आहे व यामध्ये 22 लिटर फ्रंट स्पेस देण्यात आला आहे. तसेच या स्कूटरमध्ये 12 इंचीचे अलॉय व्हिल देण्यात आले आहेत व 130 मिमी ड्रम ब्रेक बरोबर दोनची मीमी फ्रंट डिस्क आणि इंडिकेटर सर्व एलईडी लाईट्स आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरचा ग्राउंड क्लिअरन्स 165 मिमी असून सीट हे 840 मीमी उंच आहे.

Recent Posts