New Year Offer Tata Tiago : सध्या कंपन्या आपल्या कारविक्रीचा आकडा वाढवण्यासाठी विविध ऑफर जारी करत आहेत. तुम्हालाही जर नवीन कार घ्यायची असेल तर मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या महिन्यात टाटा मोटर्सने अनेक ऑफर जाहीर केल्या आहेत.
कंपनी सध्या त्यांच्या Tata Tiago वर जवळपास 60 हजारांची भरघोस सूट देत आहे. जर तुम्हाला नवीन कार घेण्याचा विचार असेल तर मग त्वरा करा. ही ऑफर व या कारबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय आहे ऑफर?
सध्या Tata Tiago वर 60000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट मिळत आहे. Tata Tiago ची किंमत मार्केटमध्ये 5.60 लाख ते 8.15 लाख रुपयांपर्यंत आहे. XE, XM, XTO, XT, XZ आणि XZ+ या सहा व्हेरिएंटमध्ये ही कार मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला ही केले खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. कारण कंपनी यावर सध्या 60 हजारांची भरघोस सूट देत आहे.
Tata Tiago कारचे स्पेसिफिकेशन
या कार मध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन आहे. हे 85Bhp व 113Nm टॉर्क जनरेट करते. कार मध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. CNG व्हेरिएंटमध्येही हे उपलब्ध आहे. CNG व्हर्जनमध्ये हे इंजिन 72Bhp आणि 95Nm टॉर्क जनरेट करते.
सीएनजीमध्ये केवळ फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. आता राहिला विषय मायलेजचा. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 20.01 kmpl ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 19.43 kmpl मायलेज देते. सीएनजी कार साधारण 26.49 किमीपर्यंत मायलेज देते.
फीचर्स
यामध्ये अनेक फीचर्स आहेत. Apple CarPlay, Android Auto, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 7-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आदी फीचर्स त्यात मिळतात. ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, कूल्ड क्लब बॉक्स, प्रीमियम लेदर सीट्स, यूएसबी चार्जिंग सॉकेट आदी फीचर्स त्यात आहेत.