ऑटोमोबाईल

कार घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! ह्युंदाई कंपनीने ‘ही’ कार केली GST फ्री, ग्राहकांचे सव्वा लाख वाचणार, वाचा डिटेल्स

Hyundai Car GST Free : नवीन वर्षाला सुरुवात होऊन आता जवळपास 11 दिवसांचा काळ उलटला आहे. या कालावधीत अनेकांनी नवीन कार खरेदी केली आहे. दरम्यान ज्या इच्छुक लोकांना अजूनही नवीन वर्षात नवीन खार खरेदी करता आलेली नाही

ते येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. विशेषतः ह्युंदाई या लोकप्रिय कंपनीच्या कारची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी खास राहणार आहे.

कारण की कंपनीने आपल्या लोकप्रिय कारला जीएसटी फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही ग्राहकांचे लाखो रुपये वाचणार आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्षात कार घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

कोणती कार झाली टॅक्स फ्री

ह्युंदाई ग्रँड i10 निओस ही कार जीएसटी फ्री करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यामुळे ग्राहकांचे तब्बल एक लाख तेवीस हजार रुपये वाचणार आहेत. परंतु ही ऑफर शोरूममध्ये कार खरेदी करणाऱ्यांसाठी राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीची ही कार आता कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट अर्थातच सीएसडी मध्ये उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी ही कार जीएसटी फ्री राहणार आहे. म्हणजेच ही कार सैन्यातील जवानांना जीएसटी फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे जे लोक सैन्यात असतील त्यांच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे. ही कार खरेदी करणाऱ्या भारतीय जवानांकडून जीएसटीचा एकही रुपया घेतला जाणार नाही अशी माहिती कंपनीने दिली आहे. यामुळे ही कार खरेदी करताना भारतीय जवानांचे एक लाख 23 हजार रुपये वाचणार आहेत.

ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी वेरियंट मध्ये उपलब्ध असून कॅन्टीनस स्टोअर्स डिपार्टमेंट मध्ये दोन्ही वेरियंट जवानांसाठी उपलब्ध राहणार आहेत. पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही मॉडेल चे जवळपास 10 वेरियंट या स्टोअर्समध्ये उपलब्ध राहणार असून जवानांना आपल्या आवडीचे व्हेरिएंट जीएसटी फ्री किमतीत खरेदी करता येणार आहे.

यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही प्रकारचे व्हेरियंट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, Grand 110 Nios च्या बेस व्हेरिएंटची Era शोरूममध्ये किंमत 592,300 रुपये आहे, तर CSD मध्ये त्याची किंमत 508,215 रुपये आहे.

म्हणजेच 84,085 रुपयांनी स्वस्त आहे. त्याच वेळी, त्याच्या Sportz प्रकाराची शोरूम किंमत 823,000 रुपये आहे, तर CSD वर त्याची किंमत 699,283 रुपये आहे. म्हणजेच या भारतीय जवानांनी ही कार सीएसडी मधून खरेदी केली तर त्यांना ही गाडी 123,717 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts