खुशखबर ! महिंद्राच्या ‘या’ SUV कारची किंमत झाली कमी, ग्राहकांना मिळणार 1.82 लाख रुपयांचा डिस्काउंट

Mahindra SUV Car Price : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

विशेषता ज्यांना महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की भारतातील दिग्गज ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या लोकप्रिय एसयुव्ही कारची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता ग्राहकांना महिंद्रा अँड महिंद्राची लोकप्रिय एसयुव्ही गाडी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या कॉम्पॅक्ट XUV 300 या एसयुव्ही कारची किंमत डबल 1.82 लाख रुपयांपर्यंत कमी केली आहे.

कंपनीकडून या गाडीवर लाखो रुपयांची सूट दिली जात असल्याने आता ग्राहकांना ही कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे. खरेतर, अलीकडे भारतीय बाजारात एसयूव्ही कारची डिमांड मोठी वाढली आहे.

विशेषता तरुणांकडून एसयूव्ही कारला विशेष पसंती मिळत आहे. यामुळे आता बाजारात विविध कंपन्या नवनवीन एसयुव्ही कार लॉन्च करत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी देखील आपल्या लोकप्रिय XUV 300 या SUV कारचे फेसलिफ्ट वर्जन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.

हे व्हर्जन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे याची झलक नुकत्याच काही दिवसांपूर्वी ग्राहकांना पाहायला मिळाली आहे.

अशा परिस्थितीत, कंपनीने आता आपल्या सध्याच्या XUV 300 या गाडीचे स्टॉक क्लिअर करण्यासाठी यावर लाखो रुपयांची सूट जाहीर केली आहे.

यामुळे आता आपण XUV 300 च्या विविध मॉडेल्सवर किती रुपयांची सूट मिळत आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती सूट मिळतेय ?

XUV 300 या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.76 लाख रुपये एवढी आहे.

याच गाडीवर कंपनीकडून मोठा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या डिस्काउंट ऑफर मध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कार्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. कंपनी टॉप-स्पेक W8 SUV वर 1.82 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.

त्याच वेळी, या व्हेरिएंटच्या 2024 मॉडेलवर 1.57 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. दुसरीकडे, XUV300 TGDi 2023 मॉडेलवर 1.75 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते आणि पेट्रोल W8 (0) ट्रिम्सवर 1.73 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते, तसेच या व्हेरिएंटच्या 2024 मॉडेलवर अनुक्रमे 1.50 लाख आणि 1.48 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Mahindra XUV300 W6 trims वर Rs 94,000 ते Rs 1.33 लाखांपर्यंत सूट मिळत आहे. तर W4 आणि W2 प्रकारांना अनुक्रमे 51,935 रुपये ते 73,000 रुपये आणि 45,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफरचा लाभ मिळणार आहे.

तथापि याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या जवळील डीलर्सशी संपर्क साधावा लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts