Maruti Brezza New Car Launch : कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेषता मारुती ब्रेझा कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी खास राहणार आहे. मारुती ही देशातील एक अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी आहे.
या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये मारुती ब्रेझा या कारचा देखील समावेश होतो. ही कार नवयुवक तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. दरम्यान कंपनीने या कारला आता अपडेट केले आहे. या कारचे नवीन वर्जन नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे.
या नवीन कार मध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहे. ही नवीन कार माइल्ड-हाइब्रिड तंत्रज्ञानासह अद्यतनित केली गेली आहे. कंपनीने ब्रेझा कारचे टॉप वरिएंटला माईंल्ड हायब्रीड तंत्रज्ञानासह लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे ही नव्याने लॉन्च झालेली अपडेटेड कार आधीपेक्षा अधिक मायलेज देणार आहे.
हा नवीन इंजिन पर्याय आता ZXI तसेच ZXI+ च्या मॅन्युअल प्रकारांमध्ये उपलब्ध राहणार आहे. मारुती सुझुकी या देशातील लोकप्रिय कंपनीने गेल्या वर्षी जुलै महिन्यात माइल्ड-हायब्रीड मॅन्युअल वेरिएंट बंद केले होते. त्यानंतर हे तंत्रज्ञान केवळ ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये उपलब्ध होते.
मात्र, हे तंत्रज्ञान आता मॅन्युअल ट्रान्समिशन प्रेमींनाही उपलब्ध करून देण्यात आले आहे. या खास तंत्रज्ञानाने ड्रायव्हिंगचा आनंद लुटता येणार आहे ज्यामुळे मायलेज आणखी चांगले होईल, अशी आशा आहे. याशिवाय कंपनीने या प्रकारात आणखी काही नवीन फीचर्सचा समावेश केला आहे.
आता आपण याच फीचर्स बाबत थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती ब्रेझाच्या या नवीन प्रकारात अनेक हायटेक फीचर्स उपलब्ध आहेत. कंपनीने सर्व आसनांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP) आणि हिल-होल्ड असिस्ट यांसारखे फीचर्स या गाडीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.
यामुळे मारुती ब्रेझा प्रेमीसाठी ही गाडी खूपच खास ठरणार आहे. Brezza मध्ये, कंपनीने 1.5 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरले आहे जे 48V सौम्य हायब्रिड सिस्टमसह येते. हे इंजिन 102 BHP पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. सौम्य-संकरित तंत्रज्ञान ब्रेक एनर्जी रिजनरेशन, आदर्श स्टार्ट/स्टॉप आणि टॉर्क सहाय्य यांसारख्या फीचर्स मुळे ही गाडी तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय बनेल अशी आशा कंपनीला आहे.
आधीच्या गाडीप्रमाणे याही गाडीला ग्राहकांकडून चांगले प्रेम मिळणार अशी आशा आहे. मारुती सुझुकीने नवीन Haier ZXI मॅन्युअल वेरिएंटची किंमत 11.05 लाख रुपये आणि ZXI+ मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 12.48 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
ही नवीन कार 19.89 केएमपीएल पर्यंतचे मायलेज देईल असा दावा करण्यात आला आहे. म्हणजे या गाडीचे मायलेज हे प्रति लिटर अंदाजे 2.51 किलोमीटरने वाढणार आहे. निश्चितच कंपनीची ही लोकप्रिय कार आता नवीन इंजिन सह लॉन्च करण्यात आली असल्याने ग्राहकांना आता आधीचे मायलेज मिळणार आहे. यामुळे या कारची लोकप्रियता आणखी वाढेल अशी आशा आहे.