New Maruti Swift : बाजारात सर्वाधिक विक्री होण्यासाठी कारमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. आता बाजारात स्वस्त किमतीत चांगल्या फीचर्सच्या अनेक गाड्या आल्या आहेत. यामुळे बजेट सेगमेंटचा बादशाह असलेल्या मारुती वॅगन आरलाही खडतर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. जर आपण मागील महिन्याबद्दल बोललो तर, मारुती स्विफ्टने पुन्हा एकदा नंबर-1 स्थान प्राप्त केले आहे.
मारुती सुझुकी वॅगन आरला मागे टाकून गेल्या महिन्यात स्विफ्टच्या एकूण 19,339 युनिट्सची विक्री झाली होती. मे 2024 मध्ये WagonR ची सर्वाधिक 17,850 युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीने नुकतेच स्विफ्टचे नवीन जनरेशन मॉडेल लाँच केले आहे. मारुती सुझुकी स्विफ्टची वैशिष्ट्ये, आणि किंमत जाणून घेऊया…
जर आपण अपडेट केलेल्या Maruti Suzuki Swift च्या इंजिनबद्दल बोललो तर, त्यात 1.2-लिटर 3-सिलेंडर Z-सीरीज पेट्रोल इंजिन आहे जे 82bhp ची कमाल पॉवर आणि 112Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. स्विफ्टच्या पेट्रोल मॅन्युअल वेरिएंटमध्ये 24.8 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. तर मारुती स्विफ्टच्या पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटचे मायलेज 25.75 किलोमीटर प्रति लिटर आहे.
अपडेटेड मारुती स्विफ्टच्या केबिनमध्ये तुम्हाला 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. याशिवाय, सुरक्षेसाठी, कारमध्ये स्टँडर्ड 6-एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. बाजारात मारुती स्विफ्टची स्पर्धा Hyundai Grand i10 Nios शी आहे.
किंमत
अपडेटेड मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग सुरू असून त्याची डिलिव्हरीही केली जात आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 9.64 लाख रुपयांपर्यंत जाते.