ऑटोमोबाईल

Best Mileage Cars : कमी पैशात जबरदस्त मायलेज, बघा भारतातील ‘या’ 4 स्ट्राँग हायब्रीड कार…

Best Mileage Cars : गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये हायब्रीड कारच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. कारण हायब्रीड कार ग्राहकांना उत्तम मायलेज देतात. या गाड्यांमध्ये एकदा इंधनाची फुल केली की, लोक न थांबता हजारो किलोमीटरचा प्रवास सहज करू शकतात. या वाहनांमध्ये मारुती आणि टोयोटासारख्या बड्या कंपन्यांच्या मॉडेल्सचा समावेश आहे.

आज आपण अशा 4 हायब्रीड कार्सबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांची एकदा टाकी फुल केली की, वाहन चालक 1,200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास सहज करू शकतात. याशिवाय ग्राहकांना या कार्समध्ये 28 kmpl पर्यंत कमाल मायलेज देखील मिळते.

पहिल्या नंबर येते ती म्हणजे मारुती सुझुकी ग्रँड विटारा, याला 45 लिटरची पेट्रोल टाकी मिळते. एकदा ही टाकी फुल केली की, कार रायडर्सना 1,259 किलोमीटरची रेंज देते. ग्रँड विटाराचे हायब्रीड व्हर्जन ग्राहकांना 27.97 kmpl चा मायलेज देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 18.33 लाख रुपये आहे.

दुसऱ्या नंबरवर येते ती म्हणजे, Toyota Urban Cruiser Hyrider ची हायब्रिड आवृत्ती जी ग्राहकांना 27.97 kmpl चा मायलेज देते. याची एकदा टाकी भरली की ही कार ग्राहकांना १,२५९ किलोमीटर मायलेज देते. या कारची इंधन टाकी 45 लीटर आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 16.66 लाख रुपये आहे.

तिसऱ्या नंबरवर येते ती म्हणजे टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची हायब्रीड आवृत्ती जी ग्राहकांना पूर्ण टाकी भरल्यानंतर 1,208 किलोमीटरची रेंज देते. इनोव्हा हायक्रॉस आपल्या ग्राहकांना 23.24 kmpl चा मायलेज देते. या कारची इंधन टाकी क्षमता 52 लीटर आहे. तर कारची एक्स-शोरूम किंमत 25.97 लाख रुपये आहे.

चौथ्या नंबरवर येते ते म्हणजे, मारुती सुझुकी इनव्हिक्टोचे हायब्रीड प्रकार जे ग्राहकांना 23.24 kmpl चे मायलेज देते. या कारची इंधन टाकी क्षमता 52 लीटर आहे जी एकदा पूर्ण झाल्यावर ग्राहकांना 1,208 किलोमीटरची श्रेणी देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 25.30 लाख रुपये आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts