Offers For The Month : जुलै महिन्यात अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारवर सर्वाधिक सूट ऑफर करत आहे, या ऑफरमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, स्कोडा आणि फोक्सवॅगन या गाड्यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात या कंपन्यांच्या वाहनांवर किती सूट मिळत आहे पाहूया…
मारुती सुझुकी
मारुती सुझुकी आपल्या वाहनांवर 2.85 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुतीच्या जिमनी एसयूव्हीवर सर्वाधिक 2.85 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 1 लाख रुपयांच्या रोख सवलतीचा समावेश आहे. जिमनी 2 व्हेरियंट Zeta आणि Alpha मध्ये ऑफर केली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 12.74 लाख ते 14.79 लाख रुपये आहे. याशिवाय, ग्रँड विटारावर 1.4 लाख रुपये आणि फ्रंटवर 72,000 रुपयांची सूट मिळू शकते. कंपनी Swift, Brezza, Alto, Wagon R, Dezire आणि Celerio वर 58,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
टाटा मोटर्स
टाटा मोटर्स जुलै 2024 पासून निवडक मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ग्राहक रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस घेऊ शकतात. या महिन्यात हॅरियर आणि सफारी सारख्या एसयूव्हीच्या खरेदीवर 38,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तर, नेक्सॉन आणि पंच वर 25,000 रुपये वाचवले जाऊ शकतात. Tata Altroz वर 50,000 रुपये, Tigor वर 55,000 रुपये आणि Tiago वर 60,000 रुपये सूट दिली जात आहे.
होंडा
होंडा बद्दल बोलायचे झाले तर, कंपनी भारतातील Creta शी स्पर्धा करणाऱ्या Elevate SUV वर 55,000 ची सूट देत आहे. याशिवाय, अमेझ आणि सिटी सारख्या सेडान मॉडेल्सवर 30,000 रुपयांची रोख सवलत देखील मिळू शकते.
ह्युंदाई
ह्युंदाई वेन्यूवर सुमारे 30,000 रुपयांची रोख सवलत आणि एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. रिपोर्ट्सनुसार, Alcazar मध्यम आकाराच्या SUV वर 65,000 पर्यंत आणि i10 Nios वर Rs 35,000 पर्यंत सूट दिली जात आहे.
फोक्सवॅगन
जर्मन कार कंपन्याही सूट देण्यात मागे नाहीत. या महिन्यात Volkswagen आपल्या Tiguan SUV वर 3.40 लाख रुपयांची सूट देत आहे. जर्मन कार निर्माता Virtus आणि Taigun च्या निवडक मॉडेल्सवर 20,000 ते 1.8 लाख पर्यंत सूट देत आहे.