Maruti Jimny Discount : भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीची लोकप्रिय कार मारुति जिम्नी मोठ्या सवलतींसह खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे. मारुती सुझुकी कंपनीने जिम्नीच्या विक्रीला चालना देण्यासाठी ही ऑफर आणली आहे.
कंपनी या ऑफ-रोड एसयूव्हीच्या अल्फा व्हेरिएंटवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत होती. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे, ही सवलत आता दीड लाख रुपयांपर्यंत दिली जात आहे. कपंनी मारुती सुझुकीच्या जेटा व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
जिम्नीच्या विक्रीवर सर्वात जास्त परिणाम होण्याचे कारण म्हणजे तिची प्रतिस्पर्धी कार महिंद्रा थार आहे, या SUV ने जिम्नीला मागे टाकले आहे. यावर्षी 2024 मध्ये, जानेवारी ते मे दरम्यान, जिम्नी साधा 1,500 चा आकडा देखील पार करू शकली नाही. मारुती सुझुकी जिम्नी गेल्या वर्षी जून 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली होती, परंतु हे वाहन भारतीय बाजारात फारसे यशस्वी झालेले नाही.
मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात जिम्नीला बंपर मागणी आहे. ही कार भारतीय बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय होत आहे. भारतात, जिम्नीचे उत्पादन गुरुग्राम प्लांटमध्ये केले जाते.
जिथून ही SUV लॅटिन अमेरिका, मध्य-पूर्व आणि आफ्रिका सारख्या बाजारपेठांमध्ये विकली जाते. मारुतीने आतापर्यंत 3 आणि 5 डोअर जिम्नीच्या 35,000 हून अधिक युनिट्सची विविध देशांमध्ये निर्यात केली आहे. यंदाच्या मे महिन्यात केवळ तीन हजार वाहनांची निर्यात झाली आहे.
किंमत
भारतीय बाजारपेठेत मारुती जिम्नीची सुरुवातीची किंमत 12.74 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. त्याच्या विभागात या कारची महिंद्र थारशी जोरदार स्पर्धा आहे.