Hero Electric Scooter : तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या तयारीत आहात का? हो, अहो मग तुम्हाला हिरो कंपनीने एक गुड न्यूज दिली आहे. कंपनीने नुकतीच बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.
यामुळे स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना आणखी एक विकल्प उपलब्ध झाला आहे. हिरो ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे.
या कंपनीच्या अनेक टू व्हीलर ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये देखील कंपनीने काही स्कूटर लॉन्च केल्या आहेत.
कंपनीने स्कूटर ब्रांड Vida लॉन्च केला आहे. ज्यावेळी हा ब्रँड लॉन्च करण्यात आला त्यावेळी कंपनीने दोन स्कूटर वॅरीयंट सादर केले होते.
त्यावेळी कंपनीने V1 Plus आणि V1 Pro या स्कूटर लॉन्च केल्या होत्या. मात्र कंपनीने काही दिवस V1 Plus बाजारात विक्री केली आणि लगेचच ही स्कूटर बंद करण्याचा निर्णय घेतला.
या स्कूटरची विक्री थांबवली यामुळे Vida ची स्वस्त स्कूटर घेऊ इच्छिणाऱ्यांना फटका बसला. आता मात्र कंपनीने पुन्हा एकदा Vida V1 Plus ही स्कूटर बाजारात लाँच केली आहे.
विशेष म्हणजे कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या V1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर पेक्षा या नव्याने लॉन्च झालेल्या स्कूटरची किंमत तीस हजार रुपयांनी कमी आहे.
त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना आता बाजारात एक नवीन स्वस्त विकल्प उपलब्ध झाला आहे. याच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही नव्याने लॉन्च करण्यात आलेली इलेक्ट्रिक स्कूटर 1.15 लाख रुपयांना बाजारात उतरवण्यात आली आहे.
या किमतींमध्ये FAME II सबसिडी आणि पोर्टेबल चार्जर यांचा समावेश आहे. दिल्ली सारख्या ठिकाणी जेथे अतिरिक्त सबसिडी लागू आहे, V1 Pro ची किंमत सुमारे 97,800 रुपयांपर्यंत खाली येते.
या स्कूटरमध्ये इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे. याचे आउटपुट 6Kw एवढे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही स्कूटर सिंगल चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर पर्यंत चालू शकते असा दावा कंपनीने केला आहे.