Hero HF Deluxe : हिरोने भारतीय बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता कंपनी सतत नवनवीन बाईक्स लॉन्च करत असते. अशातच कंपनीने आपली आणखी एक बाईक लॉन्च केली आहे.
दरम्यान कंपनी अनेक दिवसांपासून या बाईकवर काम करत होती. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करणार असाल तर कंपनीची ही बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कंपनीने बाईक अवघ्या 61 हजारात लॉन्च केली आहे. यात तुम्हाला ट्यूबलेस टायर्ससह खूप काही पाहायला मिळेल.
कंपनीने आपली Hero HF Deluxe एकूण दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे, किमतीचा विचार केला तर त्याच्या बेस मॉडेल किक-स्टार्ट व्हेरियंटची किंमत 60,760 रुपये असून सेल्फ-स्टार्ट मॉडेलची किंमत 66,408 रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. ही नवीन बाईक 4 नवीन रंगांमध्ये सादर केली आहे, ज्यात Nexus Blue, Candy Blazing Red, Heavy Gray with Black आणि Black with Sports Red यांचा समावेश आहे. तसेच त्यासोबत नवीन ‘कॅनव्हास ब्लॅक’ प्रकारही सादर केला आहे.
कॅनव्हास ब्लॅक एडिशन पूर्णपणे काळ्या थीमने सजवले असून ज्याच्या बॉडीवर कोणतेही डेकल देण्यात आले नाही. या बाईकची इंधन टाकी, बॉडी वर्क, फ्रंट व्हिझर आणि अगदी ग्रॅब रेल, अलॉय व्हील, इंजिन तसेच एक्झॉस्ट कव्हर हे सर्व काळ्या रंगात आहे, ज्यामुळे या बाईकला एक आकर्षक लुक मिळाला आहे. खूप कमी खर्चात स्पोर्टी लुकचा आनंद लुटणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
जाणून घ्या खासियत
Hero HF Deluxe ही बाईक भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय असून Splendor Plus नंतर हे कंपनीचे दुसरे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. 2023 HF Deluxe ला नवीन स्ट्राइप्स पोर्टफोलिओ मिळतो, जी बाईकसाठी नवीन ग्राफिक्स थीम आहे. नवीन स्ट्राइप्स ग्राफिक्स हेडलॅम्प काउल, फ्युएल टँक, साइड पॅनेल आणि सीटच्या खाली तुम्हाला पाहायला मिळतील.
दरम्यान या बाईकचे इंजिन नवीन RDE मानदंडांची पूर्तता करण्यासाठी अद्ययावत केले आहे. यात, कंपनीकडून त्याच बाजूला 97.2 सीसी क्षमतेचे एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे, जे 8 PS ची कमाल पॉवर आणि 8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते, ज्याला 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.
2023 Hero Selfe आणि Selfe i3S व्हेरियंट मानक म्हणून ट्यूबलेस टायर्ससह येत असून USB चार्जर पर्यायी ऍक्सेसरी म्हणून ऑफर करण्यात येत आहे. इतर फीचर्समध्ये साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ, पडताना इंजिन कट-ऑफ आणि दोन्ही टोकांना 130 मिमी ड्रम ब्रेक यांचा समावेश दिला आहे.