Hero Karizma : हिरोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्या आवडत्या बाईक्स पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. या बाईक्स लाँच झाल्यानंतर इतर कंपन्यांना सहज टक्कर देतील. कारण यात शानदार फीचर्स असणार आहेत.
दरम्यान कंपनीच्या Karizma, XPulse 400 आणि स्पोर्ट टूरर 400 या बाईक्स पुन्हा एकदा लाँच होणार आहे. कंपनी या बाईकमध्ये 400cc इंजिन देणार आहे. तसेच या बाईक्सचे मायलेजही उत्तम असणार आहे. जर तुम्ही नवीन बाईक घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
Hero New Karizma बाईक
हिरोची सर्वात लोकप्रिय बाईक Karizma पुन्हा लॉन्च होणार आहे.जिचे नाव Karizma XMR असे असणार आहे. हे नुकतेच डीलरशिपवर प्रदर्शित करण्यात आले आहे. ही बाईक पूर्णपणे नवीन स्पोर्टी डिझाइनसह तुम्हाला खरेदी करता येणार आहे. ज्यात शार्प फ्रंट फॅसिआ आणि अग्रेसिव्ह फेअरिंग, स्लीक टेल सेक्शन आणि राईज्ड हँडलबार दिला आहे. तसेच यात यात 210cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळणार आहे, जे 25bhp पॉवर आणि 30Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.
Hero XPulse 400 बाईक
Hero MotoCorp नवीन XPulse 400 बाईकही चाचणी करत असून कंपनीची आगामी बाईक शक्तिशाली इंजिनने सुसज्ज असणार आहे. या बाईकमध्ये 421cc चे नवीन इंजिन मिळण्याची शक्यता आहे. ही पॉवरट्रेन सुमारे 40bhp पॉवर आणि 35Nm टॉर्क जनरेट करू शकते. यावर्षी कंपनी सणासुदीच्या काळात ही नवीन मोटरसायकल प्रदर्शित करू शकते. तसेच कंपनी 2023 च्या उत्तरार्धात किंवा 2024 च्या सुरुवातीला लॉन्च करेल.
हिरो स्पोर्ट टूरर 400 बाईक
सध्या कंपनी फुल-फेअर स्पोर्ट्स टूरर बाइकचीही चाचणी करत असून यात नवीन 421cc लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाणार आहे. या नवीन बाईकमध्ये क्लिप-ऑन हँडलबार, फेअरिंग माउंटेड मिरर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिस्क ब्रेक्स, आयकॉनिक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स तसेच ड्युअल-चॅनल एबीएस आणि इतर फीचर्स मिळू शकतील. परंतु सध्या याच्या लॉन्चशी संबंधित कोणतीही माहिती समोर आलेली नाही.