Hero XPulse Dakar Edition Bike:- भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या बाईक्स जर बघितल्या तर त्या प्रामुख्याने होंडा तसेच हिरो मोटोकॉर्प, बजाज आणि टीव्हीएस या कंपन्यांच्या दिसून येतात. या चारही कंपन्यांच्या माध्यमातून अगदी परवडणाऱ्या किमतींपासून तर लाखो रुपये किमतींच्या बाईक सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असून ग्राहकांना त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेल्या बाईक्स मिळतात.
यामध्ये हिरो मोटोकॉर्पने देखील अनेक उत्तम अशा बाईक आजपर्यंत भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत व आता त्याही पुढे पाऊल टाकत या कंपनीने आपल्या ऑफरोड मोटरसायकल एक्सपल्स 200 4V ची डकार एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केली असून या बाईकचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही ऍडजेस्टेबल सस्पेन्शन आणि तीन एबीएस रायडींग मोडसह येते.
या बाईकला डकार रॅली पासून प्रेरित नवीन पेंट स्कीम देण्यात आली असून इंधन टाकीच्या दोन्ही साईडला डकार रॅली लोगो देण्यात आला आहे व त्यासोबत टाकीच्या अगदी तळाशी आणि बाजूला असलेल्या पॅनलवर काही स्पोर्टी काळे आणि लाल ग्राफिक्स डिझाईन करण्यात आले आहे. हे बदल वगळता दुसरे कुठलेही बदल यामध्ये करण्यात आलेले आहे.
कशी आहे या बाईकची डिझाईन?
हिरो मोटोकॉर्पच्या अधिकृत वेबसाईट नुसार बघितले तर या डकार एडिशनला नवीन साठ मिमी उंच रॅली शैलीतील विंडशील्ड आणि प्रकाराप्रमाणे एलईडी डीआरएल सह क्लास डी एलइडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आला आहे. इतकेच नाही तर यामध्ये अपडेटेड लगेज प्लेट, हॅन्डगार्ड आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.
कशी आहे या बाईकचे इंजिन?
हिरो एक्सपल्स 200 4V डकार एडिशन ही इतर प्रकाराप्रमाणे 199.6cc वाल्व ऑइल कुल्ड BS6 4V इंजिन देण्यात आले असून जे 8000 आरपीएम वर 18.8 बीएचपीची कमाल पावर आणि 6500 आरपीएम वर 17.35 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे.तसेच ट्रान्समिशन करिता हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे. हे इंजिन E-20 पेट्रोल इंजिन असून जे ओबीडी दोन अनुरूप आहे.
तसेच या बाईकला रोड,ऑफ रोड आणि रॅली मोड अशा तीन मोडमध्ये ही बाईक असून सपाट रस्त्यांसाठी रोड मोड ट्यून केला आहे. तसेच या बाईकमध्ये देण्यात आलेला ऑफ रोड मोड एबीएसची शक्ती कमी करतो व त्या मदतीने ही बाईक वाळू तसेच खडी आणि डोंगराळ भाग असलेल्या रस्त्यावर देखील चांगल्या प्रकारे चालवता येते.
तसेच रॅली मोडमध्ये ABS पूर्णपणे स्टॉप होते. तसेच या बाईकचे सस्पेन्शन बघितले तर यामध्ये पुढच्या बाजूला 250mm आणि मागच्या बाजूस 220 mm सस्पेन्शन आहे. तसेच या बाईकचा ग्राउंड क्लिअरन्स 270 mm व सीट ८९१ एमएम इतके उंच आहे.
किती आहे या बाईकची किंमत?
हिरो एक्सपल्स 200 4V प्रो डकार एडिशनची किंमत साधारणपणे एक लाख 67 हजार पाचशे रुपये( एक्स शोरूम,दिल्ली) इतकी आहे.