सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक फीचर्स असलेली वाहने उत्पादित केली जातात व लॉन्च देखील केली जातात. कारण सणासुदीच्या कालावधीमध्ये ग्राहकांच्या माध्यमातून देखील वाहन खरेदीला प्राधान्य दिले जाते.
यामध्ये स्कूटर पासून ते कारपर्यंत अनेक वाहने लॉन्च केले जातात. स्कूटरच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या बाईक बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक्स आणि स्कूटर लॉन्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना देखील आता त्यांचा बजेट आणि हवी असणारी फीचर्स असलेल्या बाईक्सचा पर्याय देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे.
याप्रमाणे जर आपण जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीच्या बाइक्स ना ग्राहकांच्या माध्यमातून खूप मोठी मागणी असते. त्या अनुषंगाने या कंपनीच्या माध्यमातून अनेक आकर्षक वैशिष्ट्य असलेल्या बाईक मार्केटमध्ये आणले जातात.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीमध्ये स्कूटर घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही हिरो मोटो कोर्पची स्कूटर विकत घेऊ शकता. कारण हिरो मोटोकॉर्प लवकर नवीन स्कूटर लॉन्च करणार असून ती बहुदा अपडेटेड डेस्टिनी 125 असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे
या स्कूटरचा अधिकृत टीझर रिलीज
हिरो मोटोकोर्प डेस्टिनी 125 स्कूटर गणेश चतुर्थीला म्हणजे सात सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च करणार अशी माहिती समोर आली आहे व इतकेच नाही तर कंपनीच्या माध्यमातून या स्कूटरचा अधिकृत टीझर रिलीज करण्यात आलेला आहे.
या टीझर नुसार बघितले तर या स्कूटरला समोरच्या एप्रनमध्ये नवीन लाइटिंगचा सेटअप देण्यात आलेला असून फ्रंटफेंडर, हेडलाईट तसेच काऊल, रियर व्ह्यू मिररमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. तसेच या नवीन अपडेटेड डेस्टिनीमध्ये नवीन ड्युअल टोन, पर्ल ब्लॅक कलरचे पर्याय असणार आहेत.
इतकेच नाहीतर हेड लॅम्प क्लस्टरला नवीन एच आकाराचे एलईडी डीआरएल देण्यात आलेले आहेत. टीझर मध्ये दिल्यानुसार बघितले तर या डेस्टिनी 125 मध्ये बाय ब्रे कॅलिपर्स, रियर डिस्क ब्रेक हे नवीन बदल देखील असण्याची शक्यता आहे.
असणार हे जबरदस्त फीचर्स
तसेच काही लीक झालेल्या फोटो नुसार बघितले तर डेस्टिनी 125 पूर्णपणे नवीन बॉडी पॅनल, नवीन आलोय व्हिल्स, ऑल ब्लॅक फ्रंट फॉर्क्स, एक्झॉस्ट कव्हर प्लेट आणि ड्युअल टोन साईड मिरर सह असणार आहे. इतकेच नाहीतर सिटच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आले असून मागे एलईडी टेल लॅम्प असणार आहे.
म्हणजे ही स्कूटर पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असणार आहे. तसेच या स्कूटरला टेक्स्ट, कॉल आणि अलर्ट सह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच या स्कूटरला हिरो स्मार्टफोन ॲपच्या माध्यमातून टर्न बाय टर्न नेवीगेशन करण्यास मदत करेल.तसेच इंजिन बघितले तर ते 124.6cc असण्याची शक्यता असून ज्याचे आउटपुट 9 बीएचपी आणि टॉर्क 10.4nm असण्याची शक्यता आहे.