Honda Bike News:- भारतामध्ये अनेक दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून यामध्ये होंडा ही एक अग्रगण्य आणि नामांकित अशी कंपनी आहे. आज पर्यंत होंडा या कंपनीने अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि परवडण्याजोग्या बाईक्स बाजारपेठेत उतरवल्या आणि ग्राहकांच्या देखील त्या खूप मोठ्या पसंतीस उतरलेल्या आहेत.
तसे पाहायला गेले तर होंडा, हिरो तसेच बजाज या कंपन्यांच्या बाईक भारतीय ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत व त्यासोबतच रॉयल एनफिल्ड बुलेट ही बाईकची तर तरुणाईमध्ये क्रेझ आहे. या अनुषंगाने जर आपण रॉयल एनफिल्डला तगडी टक्कर देईल अशी बाईक पाहिली तर होंडाने जबरदस्त वैशिष्ट्य आणि डिझाईनसह लॉन्च केली आहे. याच बाईक विषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.
होंडाने लॉन्च केली होंडा CB350 retro Classic
याबाबत सविस्तर वृत्त असे की, होंडा या कंपनीने नुकतीच भारतीय बाजारपेठेमध्ये होंडा CB350 retro Classic ही बाईक लॉन्च केली असून ही बाईक तिचे जबरदस्त फीचर्स आणि डिझाईन साठी खूप आकर्षक आहे. या नवीन असलेल्या बाईकमध्ये टाकी पुन्हा डिझाईन करण्यात आलेली असून तिला रेट्रो क्लासिक लूक देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे या बाईकच्या दोन्ही टोकांना असलेले आलॉय व्हील्स आणि डिस्क ब्रेक खूप महत्त्वाचे असून ते या बाईकच्या मॉडर्न अशा टाईम लाईनला हायलाईट करतात.
तसेच या बाईकमध्ये ड्युअल रियर शॉक, ड्युअल चॅनल एबीएस, होंडा स्मार्टफोन व्हाईस कंट्रोल सिस्टम, टेलिस्कोपिक फोकर्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी लाइटिंग इत्यादी खूप महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत.
कसे आहे या बाईकचे इंजिन?
या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर, एअर कुल्ड तंत्रज्ञानावर आधारित 346cc इंजिन देण्यात आलेले असून ते पाच स्पीड गिअरबॉक्स सह 21 bhp पावर आणि 29Nm टॉर्क जनरेट करते. तसेच या बाईकचे इंजिन हे नवीन उत्सर्जन मानक यांच्याशी सुसंगत असून ते बीएसव्हीआय ओबीडी 2-B शी सुसंगत असून यामध्ये स्लिप, असिस्ट क्लच आणि होंडा सिलेक्टबल टॉर्क कंट्रोल देखील देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेत किती आहे या बाईकची किंमत?
नवीन होंडा CB350 retro Classic ही बाईक पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले असून हिरो होंडाची नवीन बाईक डीएलएक्स आणि डीएलएक्स प्रो या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. जर आपण या बाईकची किंमत पाहिली तर ती एक लाख 93 हजार रुपये आहे. जर तुम्हाला ही बाईक बुक करायची असेल तर तुम्ही देशभरातील कोणत्याही BigWing शोरूम मधून बुक करू शकतात.