ऑटोमोबाईल

Honda Car : चुकवू नका ही अप्रतिम संधी! होंडाच्या ‘या’ लोकप्रिय कारवर मिळत आहे 30 हजार रुपयांपर्यंत सवलत, जाणून घ्या ऑफर

Honda Car : भारतीय बाजारात सर्वच कारच्या किमतीत वाढ झाली आहे. अशातच आता जर तुम्ही स्वस्तात कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता होंडाच्या सर्वात जास्त विक्री करणाऱ्या कार्स सहज कमी किमतीत खरेदी करू शकता.

होंडाच्या काही कार्सवर 30 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. जर तुम्हाला या कार्स खरेदी करायच्या असतील तर त्या तुम्हाला 30 जून पर्यंत खरेदी कराव्या लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला या कार खरेदी करता येणार नाही. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

या कारवर मिळत आहे शानदार ऑफर

होंडा अमेझ

होंडाची एंट्री-लेव्हल Amaze तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. किमतीचा विचार केला तर याच्या बेस मॉडेलची किंमत 7.01 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. तर सेडानवर 8,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सवलत 10,946 रुपयांपर्यंत रोख सवलत दिली जात आहे. 5,000 रुपयांचा लॉयल्टी लाभ आणि 7,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे.

होंडा सिटी

पाचव्या जनरेशनची Honda City ची सुरुवातीची किंमत रु. 11.52 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. जून महिन्यात, सेडान 12,296 रुपयांपर्यंतच्या रोख लाभांसह 5,000 रुपयांच्या लॉयल्टी बोनससह तसेच 6,000 रुपयांच्या कॉर्पोरेट ऑफरसह खरेदी करता येऊ शकते. परंतु होंडा सिटीवर कोणताही एक्सचेंज बोनस देण्यात येत नाही हे लक्षात घ्या.

लाँच झाली शानदार SUV

कंपनीने मध्यम आकाराची एसयूव्ही होंडा कार्स इंडियाने काल भारतात लॉन्च केली आहे. होंडाची शानदार SUV लाँच करण्यासाठी कंपनीकडून वर्ल्ड प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. या शानदार SUV ची टक्कर Hyundai Creta, Kia Seltos, MG Astor, Skoda Kushaq तसेच VW Taigun, Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Urban Cruiser Hyder यांच्याशी होणार आहे. तसेच या कारचे बुकिंग जुलै 2023 मध्ये सुरू होईल, तर किमती योग्य वेळी जाहीर करण्यात येणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts