Honda Dio H Smart : नवीन स्कुटर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता होंडाने आपली नवीन स्कुटर आणली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे होंडाच्या या स्कुटरमध्ये तुम्हाला कार सारखे फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
किमतीचा विचार केला तर या स्कुटरची किंमत सुरुवातीची किंमत 77,712 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. परंतु अजूनही कंपनीने ही स्कुटर बाजारात कधी लाँच होणार? याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. जाणून घेऊयात या स्कुटरचे फीचर्स.
वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन डिओ एच-स्मार्ट ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक (ODD-2) अंतर्गत तयार केला आहे. किमतीचा विचार केला तर कंपनीच्या एच-स्मार्ट व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 77,712 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित केली आहे.
तसेच नवीन इंजिनसह DIO STD-OBD2 प्रकाराची किंमत 70,211 रुपये ठेवली आहे. परंतु अजूनही कंपनीने त्याच्या H-Smart वेरिएंटच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही तरी, Activa Smart प्रमाणेच फिचर्स दिले जाणार आहेत.
असे असतील फीचर्स
कंपनीची आगामी स्कुटर SmartFind सारख्या अनेक प्रगत फीचर्ससह येईल, त्यामुळे राइडरला टर्न इंडिकेटर फ्लॅश करून स्कूटर शोधता येणार आहे. इतकेच नाही तर यात SmartUnlock दिले जाईल जे रायडरला हँडलबार, फ्युएल फिलर कॅप आणि की फॉब वापरून सीटखालील स्टोरेज अनलॉक करण्यास परवानगी देऊ शकते. तसेच या स्कूटरला स्मार्टसेफ मिळेल, जे स्मार्ट की काढून टाकताच स्कुटर लॉक होईल. तसेच स्मार्टस्टार्ट फीचरच्या मदतीने रायडर बटन दाबताच स्कूटर सुरू करू शकतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या एच-स्मार्ट तंत्रज्ञानाने चोरीविरोधी प्रणाली दिली जाणार आहे, जी तुमची स्कूटर सुरक्षित ठेवेल आणि ज्यावेळी तुम्ही तुमची स्कूटर कुठेतरी पार्क करत असता, त्यावेळी तुम्हाला लॉक पुन्हा पुन्हा तपासण्याची गरज पडणार नाही, तुम्ही स्कूटरपासून दोन मीटर दूर जाताच, इमोबिलायझर फंक्शन सक्रिय होऊन स्मार्ट-की लॉक नियंत्रित करण्यास सुरवात करते.
आगामी स्कुटरची आता फक्त औपचारिक लॉन्चची घोषणा बाकी असून कंपनीने नवीन OBD2 कंप्लायंट व्हेरियंटसाठी बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. यात पूर्वीप्रमाणेच, 109cc सिंगल सिलेंडर नियमित इंजिन दिले जाणार आहे, जे 7.7 BHP पॉवर आणि 9 Nm टॉर्क जनरेट करू शकते.