Honda Electric Van:- वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर झपाट्याने बदल होत असून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांऐवजी आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे व सरकारच्या माध्यमातून देखील याला प्रोत्साहन दिले जात आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये इथेनॉल तसेच हायड्रोजनवर चालणारी वाहने आपल्याला बघायला मिळतील. अत्यंत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्यामुळे वाहन निर्मिती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे.
यामध्ये जर इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याकडे देखील आता ग्राहकांचा कल वाढल्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारेल यात शंकाच नाही.
त्यामुळे आता कारनिर्मिती क्षेत्राचा विचार केला तर अनेक प्रसिद्ध कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक कार निर्मितीकडे वळल्या असून त्यातीलच एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध कंपनी म्हणजे होंडा कंपनी होय. होंडा कंपनीने देखील आता जागतिक बाजारपेठेमध्ये एक स्टायलिश लुक ची इलेक्ट्रिक व्हॅन लॉन्च करण्याची तयारी चालवली असून त्यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
जागतिक बाजारपेठेत होंडा करणार ही स्टायलिश व्हॅन लॉन्च
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, होंडा कंपनी लवकरच जागतिक मार्केटमध्ये एक स्टायलिश व्हॅन लॉन्च करण्याच्या तयारीत असून ही एक इलेक्ट्रिक व्हर्जन कार असणार आहे. विशेष म्हणजे ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर 210 किलोमीटर पर्यंत रेंज देईल असा कंपनीकडून दावा करण्यात आलेला आहे.
तसेच जर तुम्हाला तुमच्या घरातील पंखे किंवा बल्ब चालवायचे असतील तरी तुम्ही या कारच्या माध्यमातून वीज पुरवठा करू शकतात. कंपनीने या गाडीचे नाव होंडा एन- व्हॅन(Honda N-Van)असं ठेवले असून या इलेक्ट्रिक व्हॅनची लांबी ३३९५ एमएम व रुंदी 1475 एमएम इतकी आहे. उंचीचा विचार केला तर ही 1950mm एवढी उंच आहे. विशेष म्हणजे ही पाच डोअर म्हणजेच फाईव्ह डोअर व्हॅन असून यामध्ये 2520 एमएमचा व्हील बेस देण्यात आला आहे. तसेच या इलेक्ट्रिक व्हॅनचे वजन 350 किलोग्रॅम असण्याची शक्यता आहे.
या इलेक्ट्रिक व्हॅन मधील बॅटरी कशी आहे?
या इलेक्ट्रिक व्हॅन मध्ये 1500 W ची बॅटरी बसवण्यात येणार असून ही एकदा फुल चार्ज केल्यानंतर 210 किलोमीटर पर्यंत धावेल. तसेच या व्हॅनमध्ये सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील देण्यात आले आहेत. तसेच जमीन ते स्टोरेज फ्लॉवर बोर्ड पर्यंत 525mm चा स्पेस उपलब्ध असणार आहे. होंडाच्या या व्हॅनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कारला देण्यात आलेल्या मोठ्या व्हील्समुळे या व्हॅनला खूप वैशिष्ट्यपूर्ण लूक मिळाला आहे.
तसेच यामध्ये 1500 वॉटचे पावर आउटपुट असणार आहे व यामध्ये बाहेरील बाजूस देण्यात आलेल्या पोर्टच्या माध्यमातून विद्युत उपकरणे प्लग इन करता येणार आहेत व या माध्यमातून तुम्ही घरातील पंखे किंवा बल्ब देखील चालवू शकणार आहात.
किती राहू शकते या इलेक्ट्रिक व्हॅनची किंमत?
जर या संबंधी आपण काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्यांच्यानुसार 28 ऑक्टोबरला जपान या ठिकाणी जो काही मोबिलिटी शो होणार आहे त्यामध्ये Honda N-Van चा प्रोटोटाईप दाखवण्यात येणार असून इलेक्ट्रिक व्हॅन आठ लाख एकतीस हजार रुपये( एक्स शोरूम किंमत) मध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये सहा रंगांचे म्हणजे सहा कलर ऑप्शन उपलब्ध असून इकॉन मोडमध्ये ही व्हॅन विजेचे बिल कमी करण्यासाठी देखील मदत करू शकणार आहे.