ऑटोमोबाईल

Honda Elevate SUV : खरंच? क्रेटा, सेल्टॉस आणि ग्रँड विटाराला टक्कर देणार होंडाची ‘ही’ शक्तिशाली SUV; पहा किंमत आणि फीचर्स

Honda Elevate SUV : तुम्हाला आता बाजारात होंडाची Elevate SUV धुमाकूळ घालताना दिसेल. कंपनीची ही कार आता तुम्हाला मार्केटमधील क्रेटा, सेल्टॉस आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा यांसारख्या कार कंपन्यांना टक्कर देताना दिसेल.

कंपनीने या कारला बोल्ड आणि स्टायलिश लुक दिला आहे. तसेच यात कंपनीकडून आपल्या नवीन ग्राहकांसाठी शक्तिशाली फीचर्स दिली जाणार आहेत. जुलै महिन्यात या कारचे बुकिंग सुरू होणार आहे. किती असणार या कारची किंमत? जाणून घेऊयात.

इंटीरियर डिझाईन कसे असणार?

आता कंपनीच्या नवीन मिडसाईज SUV Elevate च्या इंटीरियरबद्दल सांगायचे झाले तर, या SUV मध्ये कंपनीकडून एक आलिशान डॅशबोर्ड तसेच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्टसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रीअर व्ह्यू कॅमेरा, 7-इंचाचा TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टंट देण्यात आला आहे. मानक सेफ्टी फीचर्स म्हणून यात हिल स्टार्ट असिस्ट, मागील पार्किंग सेन्सर्स आणि मागील सीट रिमाइंडर दिले आहेत.

इंजिन

कंपनीच्या या नवीन कारमध्ये 1.5-liter DOHC i-VTEC इंजिन दिले आहे, जे 119 hp ची कमाल पॉवर तसेच 145 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सारखे ट्रान्समिशन पर्याय कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सेफ्टी फीचर्स

दरम्यान कंपनीकडून या SUV ला अनेक सेफ्टी फीचर्ससह सादर करण्यात आले आहे. ही कार अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम, रोड डिपार्चर मिटिगेशन सिस्टीम तसेच लेन किपिंग असिस्ट सिस्टम, व्हेईकल स्टॅबिलिटी असिस्ट, लेनवॉच आणि आपत्कालीन स्टॉप सिग्नलने सुसज्ज असणार आहे.

अशी असेल रचना

आगामी SUV च्या रचनेबद्दल बोलायचे झाले तर Honda Elevate ची लांबी 4,312 mm, रुंदी 1,790 mm तसेच उंची 1,650 mm इतकी आहे. कारचा व्हीलबेस 2,650 मिमी असून बूट स्पेस 458 लिटर आहे. कारच्या लूक आणि डिझाईनबद्दल सांगायचे झाले तर या कारच्या समोर होंडा लोगो असणारी मोठी ग्रिल देण्यात आली आहे.

इतकेच नाही तर यात क्रोम सराउंडसह अतिशय आकर्षक एलईडी हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्स दिले जात आहे. यात फ्लेर्ड व्हील आर्च, शार्क फिन अँटेना, फंक्शनल रूफ रेल आणि 16-इंच मल्टी-स्पोक अलॉय व्हील यासारखी बाह्य फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतील.

या कंपन्यांना देणार टक्कर

भारतीय बाजारात, Elevate या विभागातील सर्वात जास्त विक्री करणाऱ्या Hyundai Creta, Kia Seltos, मारुती सुझुकी Grand Vitara तसेच Skoda Kushaq, MG Aster, Volkswagen Tigun आणि Toyota Urban Cruiser Hyrider या कार्सना टक्कर देताना पाहायला मिळेल.

किंमत

किमतीचा विचार केला तर आगामी काळात भारतीय बाजारपेठेत 10 लाख रुपयांपेक्षा अधिक प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात येऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts