ऑटोमोबाईल

Honda Elevate SUV : Hyundai Creta ला टक्कर देणार Honda ची नवीन शक्तिशाली Elevate SUV, मिळणार हे 5 मजबूत फायदे

Honda Elevate SUV : भारतीय कार बाजारात सतत नवनवीन कार लॉन्च होत आहेत. या कार खरेदी करण्यासाठी ग्राहकही खूप लक्ष ठेवून असतात. अशा वेळी जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे.

कारण देशात बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारी Hyundai Creta ही कार ग्राहकांना खूप पसंत पडत आहे. मात्र आता या कारला थेट टक्कर देण्यासाठी Honda ने अलीकडेच आपली Elevate SUV भारतात लॉन्च होत आहे.

जर एलिव्हेट ही कार लॉन्च झाली तर या कारला खूप मागणी असेल असे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही कार कंपनीची एक महत्त्वाची आगामी मॉडेल होती. त्यामुळे एलिव्हेट एसयूव्ही कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत करेल असा अंदाज आहे. ही कार लॉन्च केल्यानंतर होंडाला मिळणाऱ्या 5 प्रमुख फायद्यांवर जाणून घ्या…

वेगाने वाढणाऱ्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश

कंपनीची ही मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. ही कार बाजारपेठेत थेट Hyundai Creta शी स्पर्धा करणार आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत SUV म्हणून BR-V देखील आणली, परंतु सर्व वैशिष्ट्ये असूनही, BR-V ही कार ग्राहकांमध्ये पसंत पडली नाही.

प्रोडक्ट लाइनअप मध्ये नवीन पर्याय

ही एक अशी SUV आहे जी उत्पादनांची श्रेणी वैविध्यपूर्ण बनवते. देशातील एकूण कार विक्रीमध्ये सेडानचा वाटा फारच कमी आहे आणि कंपनीकडे विसंबून राहण्यासाठी छोटी कारही नाही. मात्र Elevate ही कार उत्पादनांची श्रेणी वाढवण्यासाठी परिपूर्ण कार आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर

होंडा बाजारात अनेक कार लॉन्च करत आहे. मात्र या कारला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद दिसून येत नाही. मात्र नवीन Elevate ला Honda Sensing तंत्रज्ञान मिळते जे कंपनीचे ADAS चे प्रकार आहे.

त्याच वेळी, Elevate ला 10.25-इंच डिस्प्ले स्क्रीन देखील मिळते, जी भारतातील कोणत्याही Honda मॉडेलवर सर्वात मोठी आहे. यासोबतच सात इंची ड्राईव्ह डिस्प्ले स्क्रीन, टेलिमॅटिक्स, सनरूफ आणि इतर अनेक फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

स्पेस आणि कंफर्ट

कंपनीने या कारकडे विशेष लक्ष दिले आहे. कारण कंपनीने या कारचे इंटिरियर खूप स्टायलिश आणि कंफर्ट आहे. तसेच केबिन डिझाइन उत्तम आहे. एलिव्हेटचा व्हीलबेस क्रेटापेक्षा 30 मिमी लांब आहे.

भारतात पहिली विक्री

Honda Elevate SUV प्रथम भारतीय कार बाजारात विकली जाईल. कंपनीने हे सांगितले आहे की भारत भविष्यात विदेशी बाजारपेठांमध्ये एलिव्हेटच्या निर्यातीसाठी आधार म्हणून काम करेल.

तसेच यासोबतच कंपनी एलिव्हेटला पूर्णपणे इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च करणार आहे. कंपनी जुलैमध्ये बुकिंग सुरू करेल आणि सणासुदीच्या काळात त्याच्या किमती जाहीर केल्या जातील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts