Hyundai New SUV : मारुती सुझूकीनंतर भारतात सर्वात जास्त कार विक्री करण्याचा भीष्म पराक्रम ज्या कंपनीच्या नावावर आहे ती कंपनी म्हणजे ह्युंदाई. दरम्यान, भारतात सर्वाधिक कार विक्री करणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी ह्युंदाईने नुकतीच ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे.
कंपनीने एक नवीन सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज अशी नवीन SUV कार लॉन्च केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाई कंपनीने भारतात Venue चे एक नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहे.
या नवीन व्हेरिएंटमध्ये फक्त मॅन्युअल गेअर बॉक्स राहणार आहे. या नवीन व्हेरिएंटला एक्झिक्युटिव्ह टर्बो म्हटले जात आहे. त्याची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
नवीन प्रकार फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह विकला जाणार आहे. याशिवाय, Hyundai ने Venue S (O) Turbo मध्ये आणखी फीचर्स जोडले आहेत.
अद्यतनित Hyundai Venue S (O) Turbo ट्रिम मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी रु. 10.75 लाख (एक्स-शोरूम) च्या किमतीत उपलब्ध आहे, तर 7-स्पीड DCT व्हेन्यू एक्झिक्युटिव्ह टर्बोची किंमत 11.86 लाख (एक्स-शोरूम) एवढी आहे. अशा परिस्थितीत, आता आपण या नवीन वॅरियंटचे फीचर्स थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसे आहेत फिचर्स?
कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन वॅरियंटमध्ये काय काय फीचर्स आहे हे आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज, TPMS, 8.0-इंच डिस्प्लेसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
याशिवाय, यात 2 सीट रिक्लिनिंग रिअर सीट, ड्रायव्हरची आर्मरेस्ट विथ स्टोरेज, रिअर एसी व्हेंट, क्रूझ कंट्रोल, ईएसपी आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आहेत.
यात एकमेव प्रमुख अपग्रेडेशन झाले आहे ते म्हणजे या कारच्या मागील बाजूस एक मोठा लोगो देण्यात आला आहे.
कसे राहणार इंजिन ?
Hyundai Venue च्या एक्झिक्युटिव्ह टर्बो व्हेरियंटच्या इंजिन पॉवरट्रेनची देखील आता आपण माहिती पाहणार आहोत.
कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या नव्या व्हेरियंटमध्ये 1.0-litre 3-pot GDi टर्बो इंजिन आहे, जे की, 118bhp ची पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा कंपनीने केला आहे.