ऑटोमोबाईल

Hyundai Santro: Hyundai ने Santro चे उत्पादन बंद करून घेतला मोठा निर्णय, अहवालातुन स्पष्ट केले मुद्दे

Hyundai Santro : Hyundai ने त्यांच्या तामिळनाडू प्लांटमध्ये (Tamil Nadu plant) भारतात एंट्री-लेव्हल हॅचबॅक (Entry-level hatchback) कार Santro चे उत्पादन थांबवले आहे. ह्युंदाईने कमी मागणीमुळे भारतात सॅन्ट्रो बंद केल्याचे नुकत्याच आलेल्या एका अहवालातून (report) समोर आले आहे.

Hyundai Santro हे अतिशय लोकप्रिय नाव आहे. कारने (Car) १९९८ मध्ये प्रथमच विक्रीसाठी आणलेल्या पहिल्या डावात कोरियन ब्रँडला भारतीय ऑटो क्षेत्रात लोकप्रिय केले. तथापि, २०१८ मध्ये हे मॉडेल (Model) नवीन अवतारात सादर करण्यात आले. पण त्याला अपेक्षेइतकी लोकप्रियता मिळाली नाही.

मात्र आता ह्युंदाईने संसाधने एकत्रित करण्याच्या आणि पुरवठा साखळीतील अडथळे कमी करण्याच्या प्रयत्नात कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकृत विधानासाठी Hyundai शी संपर्क साधण्यात आला होता, परंतु कंपनीने अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही.

अलीकडेच, लीक झालेल्या दस्तऐवजात सॅन्ट्रो पेट्रोल बंद झाल्याचे उघड झाले आहे. या कारच्या सीएनजी प्रकाराची विक्री सुरूच राहणार आहे. अहवालानुसार, अनेक Hyundai डीलरशिपने देखील पुष्टी केली आहे की स्टॉक संपेपर्यंत पेट्रोल आवृत्ती विकली जात आहे. सीएनजी मॉडेलबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नाही.

ह्युंदाईने सध्याच्या कारच्या CNG आधारित आवृत्त्या विकसित करण्याचा अलीकडचा दबाव लक्षात घेता, एंट्री-लेव्हल कारमध्ये सँट्रो हा एक चांगला पर्याय होता. परंतु उत्पादन आणि नफा एकत्रित करण्याच्या हितासाठी कंपनी त्याची पुनरावृत्ती करू शकते.

Hyundai Santro 2018 मध्ये रु. 3.9 लाख ते रु. 5.5 लाख (एक्स-शोरूम) च्या रेंजमध्ये मोठ्या धूमधडाक्यात पुन्हा लॉन्च करण्यात आली. तथापि, अलीकडच्या काही दिवसांत कोरोना महामारी, सेमीकंडक्टर चिपची कमतरता आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या इनपुट खर्चामुळे मॉडेल्सच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts