ऑटोमोबाईल

पैसे तयार ठेवा ! ह्युंदाई लवकरच लाँच करणार ‘या’ 2 नवीन कार, मार्केट गाजवणार

Hyundai Upcoming Car : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला आताच पैसे जमवून ठेवावे लागणार आहेत. कारण की भारतीय कार मार्केटमध्ये ह्युंदाई कंपनी लवकरच दोन नवीन गाड्या लॉन्च करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

खरेतर भारतीय कार मार्केटमध्ये ह्युंदाईच्या अनेक गाड्या लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या कार्स भारतीय ग्राहकांना खूपचं आवडतात. Hyundai Creta, Hyundai Venue, Hyundai Alcazar, Hyundai i20 आणि Hyundai Verna सारख्या गाड्या भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत.

या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्या देखील आहेत. दरम्यान आता कंपनी परवडणाऱ्या किमतीत नवीन कार लाँच करणार आहे. Hyundai India आगामी काळात 2 नवीन SUV कार लाँच करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आहे.

अशा परिस्थितीत आज आपण ह्युंदाई कंपनी आगामी काळात कोणत्या दोन नवीन कार लॉन्च करणार आणि त्यांचे फीचर्स कसे असणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

ह्युंदाई बायॉन : Hyundai कंपनी आपल्या SUV सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी वाढवणार आहे. यासाठी ग्लोबल Bayon कारसारखी एक नवीन क्रॉसओवर भारतात लॉन्च करू शकते असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

भारतात आपल्या SUV लाइनअपचा विस्तार करण्यासाठी कंपनी लवकरच ही गाडी भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च करणार असे बोलले जात आहे. या आगामी Hyundai SUV ला Bc4i असे कोडनेम देण्यात आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की Hyundai i20 च्या प्लॅटफॉर्मवर तयार केलेली ही SUV 2027 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. नक्कीच आगामी काळात ह्युंदाई SUV चा पोर्टफोलिओ या गाडीमुळे आणखी स्ट्रॉंग होणार आहे. 

New Hyundai Venue : ह्युंदाई ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी चा नंबर लागतो. दरम्यान आता ह्युंदाई कंपनी आपल्या सर्वात लोकप्रिय Hyundai Venyu या गाडीचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे.

कंपनी 2025 मध्ये ही अपडेटेड गाडी भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाई व्हेन्यूच्या एक्सटेरियर आणि इंटेरियर मध्ये अनेक मूलभूत बदल होणार आहेत.

मात्र या गाडीच्या पावर ट्रेनमध्ये फारसा बदल होणार नाही. म्हणजे सध्याच्या मॉडेलमध्ये जे पावरट्रेन दिले जात आहे तेच पावरट्रेन अपडेटेड कार मध्ये देखील राहणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. पण आगामी अपडेटेड गाडीच्या किमतीत काहीशी वाढ पाहायला मिळणार आहे.  

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts