ऑटोमोबाईल

9 सप्टेंबरला लॉन्च होणार ह्युंदाई कंपनीची ‘ही’ नवीन कार ! कसे असतील फिचर्स?

Hyundai Upcoming Car : आपल्यापैकी अनेकांचे नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल. जर तुम्हीही यंदाच्या फेस्टिव सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना नजीकच्या भविष्यात एखादी नवीन SUV खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये SUV कार्सची मागणी वाढली आहे. सेडान ऐवजी आता एसयुव्ही गाड्यांना अधिक मागणी आहे. एका आकडेवारीनुसार जानेवारी ते जून 2024 या काळात भारतातील एकूण कार विक्रीपैकी 52% वाटा एकट्या SUV सेगमेंटचा होता.

दरम्यान, SUV गाड्यांची हीच मागणी लक्षात घेऊन आघाडीची कार उत्पादक कंपनी Hyundai India लवकरच एक नवीन Suv लॉन्च करणार आहे. कंपनी आपली लोकप्रिय SUV Alcazar ची अपडेटेड आवृत्ती लॉन्च करणार अशी माहिती कंपनीने दिली आहे.

सप्टेंबरच्या नऊ तारखेला आगामी Hyundai Alcazar भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्टचे फीचर्स कसे असू शकतात या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

इंजिन अन फिचर्स कसे असतील?

Hyundai Alcazar फेसलिफ्टच पॉवरट्रेन म्हणजेच इंजिन आधीच्या मॉडेल सारखेच राहणार आहे. यात 1.5-लीटर डिझेल इंजिन आहे जे 116bhp ची कमाल पॉवर आणि 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे.

याशिवाय, SUV मध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील आहे जे जास्तीत जास्त 160bhp ची पॉवर आणि 253Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. Hyundai Alcazar फेसलिफ्टच्या केबिनमध्ये ड्युअल 10.25-इंच स्क्रीन, स्वयंचलित हवामान नियंत्रण सारखे फीचर्स राहणार आहेत.

याच्या टॉप व्हेरियंटमध्ये 70 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. याशिवाय आगामी एसयूव्हीमध्ये ADAS तंत्रज्ञानही देण्यात आले आहेत. यात फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल कॅमेरा डॅश कॅम सेटअप राहणार आहे.

या आगामी एसयूव्हीमध्ये बोस प्रीमियम साउंड सिस्टम, एक्यूआय डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि वायरलेस स्मार्टफोन चार्जर सुद्धा असेल.

सेफ्टी किटमध्ये ESC, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, 6-एअरबॅग्ज, वाहन स्थिरता व्यवस्थापन, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल आणि सराउंड व्ह्यू मॉनिटर यांचा समावेश राहणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts