Hyundai Upcoming SUV : ह्युंदाई कंपनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्यांना ह्युंदाईची नवीन गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच भारतीय कार मार्केटमध्ये आपल्या एका लोकप्रिय SUV चे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करणार आहे. यामुळे कंपनीचा एसयूव्ही सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी दमदार बनणार आहे.
भारतात SUV गाड्यांना किती मागणी आहे हे वेगळं सांगायला नको. एसयुव्ही गाड्यांची मागणी पाहता आता ऑटो कंपन्या या गाड्यांच्या प्रोडक्शन वर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. ऑटो कंपन्यांच्या माध्यमातून नवनवीन एसयूव्ही गाड्या लॉन्च केल्या जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ह्युंदाई कंपनीने क्रेटा या आपल्या लोकप्रिय SUV चे नवीन जनरेशन बाजारात उतरवले होते.
या नवीन जनरेशन क्रेटाला ग्राहकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. यामुळे आता ह्युंदाई कंपनी आपल्या लोकप्रिय अल्काझर या SUV चे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हे अपडेटेड फेसलिफ्ट मॉडेल कधी लॉन्च होणार या संदर्भात कंपनीकडून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
कधी लाँच होणार Alcazar SUV Facelift
मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्याच्या अर्थातच सप्टेंबरच्या नऊ तारखेला Alcazar SUV चे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय कार बाजारात लॉन्च केले जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या आगामी फेसलिफ्ट मॉडेलच्या फीचर्स आणि किमती संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असणार फिचर्स?
Alcazar SUV चे फेसलिफ्ट मॉडेल चाचणी वेळा अनेकदा पाहायला मिळाले आहे. या आगामी फेसलिफ्ट मॉडेल मध्ये अनेक बदल दिसताय. ही गाडी सध्याच्या मॉडेल पेक्षा अधिक मजबूत असेल. या गाडीच्या डिझाईन मध्ये देखील काही बदल झालेले आहेत.
या गाडीच्या पुढील भागात अनेक चेंजेस केले गेले आहेत. म्हणून ही गाडी पूर्णपणे नवीन आणि स्टायलिश दिसतेय. तसेच या एसयूव्हीच्या मागील भागातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या आगामी फेसलिफ्ट मॉडेल मध्ये स्प्लिट हेडलॅम्प्स दिलेले आहेत जे की अगदीच क्रेटा सारखे आहेत.
मात्र या गाडीच्या ग्रिल आणि फ्रंट बंपर वेगळे आहेत. या गाडीच्या अलॉय व्हील्स आणि साइड प्रोफाइलमध्ये कोणतेच बदल झालेले नाहीत. ही गाडी 6 आणि 7 सीटर मध्ये लॉन्च केली जाणार आहे. या गाडीच्या इंजिन मध्ये फारसे बदल होणार नाहीत.
यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. टर्बो पेट्रोल इंजिन 160 एचपी पॉवर आणि 253 एनएम पीक टॉर्क जनरेट करणार अशी माहिती समोर आली आहे. तसेच या आगामी गाडीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले जाणार आहे.
तसेच या गाडीचे डिझेल इंजिन 116 एचपी पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करणार असे बोलले जात आहे. या इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले जाणार आहेत.
किंमत किती राहणार?
या अपकमिंग फेसलिफ्ट मॉडेलची किंमत किती राहणार या संदर्भात अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. परंतु या आगामी फेसलिफ्ट मॉडेलच्या किमती सध्याच्या मॉडेल पेक्षा थोड्याशा अधिक राहणार आहेत. यामुळे या अपकमिंग फेसलिफ्ट मॉडेलची किंमत नेमकी किती राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.