ऑटोमोबाईल

Hyundai Venue : Creta पेक्षा भन्नाट फीचर्स अन् मस्त मायलेजसह अवघ्या 7.76 लाखात घरी आणा ‘ही’ शक्तिशाली SUV

Hyundai Venue : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात मे 2023 मध्ये Hyundai ची लोकप्रिय कार Hyundai Venue ने धुमाकूळ घातला आहे.

बाजारात या एसयूव्ही कार खरेदीसाठी मागच्या महिन्यात तुफान गर्दी पाहायला मिळाली होती. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि मागच्या महिन्यात Hyundai Venue च्या विक्री मध्ये तब्बल 23 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

गेल्या वर्षी मे 2022 मध्ये 8,300 युनिट्सच्या तुलनेत तिने 10,213 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, जी त्याची 23 टक्के वाढ (YoY) दर्शवते. या उत्कृष्ट SUV ने महिंद्रा स्कॉर्पिओ, मारुती ग्रँड विटारा, मारुती फ्रॉन्क्स, किया सोनेट आणि महिंद्रा XUV700 ला मागे टाकून नंबर-5 स्थान पटकावले.

Hyundai Venue  किंमत

Hyundai ने काही दिवसांपूर्वी Venue ची किंमत वाढवली होती, त्यानंतर Hyundai Venue ची किंमत Rs 7.72 लाख पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी Rs 13.81 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Hyundai Venue फीचर्स

यामध्ये 8-इंच टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक, अलेक्सा आणि गुगल व्हॉईस असिस्टंट, 4-वे पॉवर ड्रायव्हर, सनरूफ, ऑटो एसी, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, एअर प्युरिफायर, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, वायरलेस फोन चार्जिंग, चार एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) यांचा समावेश आहे.  टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), EBD सह ABS, रिव्हर्स कॅमेरा आणि हिल-होल्ड असिस्ट सारखी कंट्रोल फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.

Hyundai Venue  इंजिन

SUV तीन इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल – 1.2-लीटर पेट्रोल (83 PS/114NM) (5-स्पीड MT), 1.0-लिटर टर्बो पेट्रोल (120PS/172NM) (6-स्पीड iMT आणि 7-स्पीड DCT) आणि 1.5. -लिटर डिझेल (5-स्पीड MT). 100PS/240NM) (6-स्पीड MT). ही 5 सीटर कार आहे, म्हणजे यात पाच लोक बसू शकतात. बाजारात त्याची स्पर्धा Tata Nexon, Maruti Suzuki Brezza, Kia Sonet, Renault Kiger आणि Mahindra XUV300 शी आहे.

हे पण वाचा :- Maruti Baleno, Tata Altroz ​​ला नवीन अवतारात टक्कर देणार Hyundai ची ‘ही’ लोकप्रिय कार, जबरदस्त फीचर्ससह किंमत असणार फक्त ..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts