Hyundai New Alcazar : Hyundaiने आपल्या सर्वात चर्चित असलेल्या मॉडेल्सच्या लोकप्रियतेचा फायदा घेत, आणखी एक नवीन कार मार्केटमध्ये सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कपंनी एक-एक करून नवीन फेसलिफ्ट मॉडेल्स बाजरात सादर करत आहे. अशातच कपंनी आता आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Alcazar कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
ह्युंदाई कंपनीच्या या लोकप्रिय कारची टेस्ट राईड नुकतीच पाहायला मिळाली. यावेळी, Alcazar च्या फेसलिफ्ट मॉडेलची अनेक वैशिष्ट्ये समोर आली आहेत. या कारमध्ये ग्राहकांना अनेक अपडेट फीचर्स पाहायला मिळणार आहेत, चला त्याबद्दल जाणून घेऊया…
Hyundai Alcazar वैशिष्ट्ये
Hyundai च्या Alcazar कारमध्ये केलेल्या सुधारणांनंतर, कारच्या मागील बाजूस आकर्षक 19-इंच अलॉय व्हील आणि Palisade प्रेरित वर्टिकल सेट टेललाइट्ससह सादर केले गेले आहे. त्याचे हेडलाइट्स आणि LED DRLs Creta सारखेच आहेत, नवीन अल्काझारच्या समोरील बाजूस आकर्षक अपडेट देण्यात आले आहेत.
अपडेट केलेल्या Alcazar मध्ये समाविष्ट वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, यात 19 वैशिष्ट्यांसह लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञानाचा समावेश असेल. पॉवरट्रेनचे पर्याय कोणत्याही बदलाशिवाय विद्यमान मॉडेलप्रमाणेच राहतील. बदल म्हणून, सॉफ्ट-टच प्लास्टिकसह नवीन क्रेटासारखा डॅशबोर्ड आढळू शकतो. ही कार ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, वायर्ड अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्लेसह ट्विन 10.25-इंच डिस्प्ले यासारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येते.
नवीन Hyundai Alcazar किंमत
Hyundai च्या या अपडेट नवीन Alcazar कारच्या किंमतीबाबत माहिती अजून शेअर केलेली नाही. परंतु या वर्षाच्या अखेरीस सणासुदीच्या हंगामात सुमारे 17 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.