Tata Punch : जर तुम्ही सध्या नवीन एसयूव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला जून महिन्यातील टॉप १० एसयूव्ही विक्रीची नावे सांगणात आहोत, जेणेकरून तुम्हाला नवीन एसयूव्ही खरेदी करण्यात मदत होईल.
गेल्या काही काळापासून एसयूव्ही वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. या शर्यतीत काहींनी तळ गाठवा लागला आहे. नुकतीच जून महिन्यातील देशातील सर्वाधिक विक्री झालेल्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांच्या विक्री अहवालाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, टाटा पंचने पुन्हा एकदा टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV वाहनांची रेस जिंकली आहे.
विक्रीच्या बाबतीत, या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीने या वर्षी जूनमध्ये 66 टक्के वाढीसह 18,238 वाहनांची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी हा आकडा 10,990 इतका होता.
जून महिन्याच्या विक्री अहवालानुसार, पहिल्या दहाच्या यादीत Hyundai Creta चे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. जून 2023 मध्ये, Hyundai Creta च्या 14,447 वाहनांची विक्री झाली. यावर्षी 16,293 वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुतीच्या ब्रेझाच्या विक्री अहवालानुसार, यावर्षी जूनमध्ये 13,172 वाहनांचा विक्रम झाला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हा आकडा केवळ 10,538 वाहनांवर पोहोचला होता. यानंतर या यादीत महिंद्रा स्कॉर्पिओचा क्रमांक लागला. या एसयूव्हीच्या 12,307 वाहनांची गेल्या महिन्यात विक्री झाली. तर गेल्या वर्षी या कालावधीत केवळ 8,648 वाहनांची विक्री झाली होती. या वर्षी जून महिन्यात विक्रीच्या बाबतीत ही कार चौथ्या स्थानावर आहे.
सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही कारच्या यादीत टाटा नेक्सॉनचे नाव पाचव्या स्थानावर आहे. जे 12,066 ची विक्री गाठण्यात यशस्वी ठरले. या SUV ने मागील वर्षी 13,827 च्या तुलनेत एकूण 12,066 वाहने विकली आहेत. मासिक विक्रीच्या नोंदीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. त्याच्या विक्रीत 13 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
या यादीत पुढे दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई मोटर कंपनीचे वेन्यू हे वाहन आहे. या कारच्या 9,890 विक्रीसह, जूनच्या शेवटच्या महिन्यात सहावे स्थान प्राप्त केले आहे. तर गेल्या वर्षी त्याची विक्री 11,606 वर पोहोचली होती. ह्युंदाई मोटर कंपनीच्या वेन्यू विक्रीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्क्यांनी घट झाली आहे. या यादीत सातव्या क्रमांकावर असलेल्या Kia Sonet या कारने मागील विक्रम मोडीत काढत यावर्षी 9,816 वाहनांच्या विक्रीसह 27 टक्के वाढ नोंदवली आहे.
टॉप टेनच्या एसयूव्ही वाहनांच्या यादीत, मारुती सुझुकी फ्रोंक्सचे नाव 8 व्या क्रमांकावर आहे. या वर्षी जून महिन्यात 9,688 वाहनांची विक्री गाठली आहे, तर मारुती ग्रँड विटारा 9,679 वाहनांच्या विक्रीसह नवव्या स्थानावर पोहोचली आहे आणि महिंद्रा XUV 3XO 8,500 वाहनांच्या विक्रीसह यादीत दहाव्या स्थानावर पोहोचली आहे.