Rolls Royas Car: रोल्स रॉयस ही अशा पद्धतीची कार आहे की ही कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे कोटी रुपये जरी असले तरी तुम्ही सहजतेने खरेदी करू शकत नाही. तुम्ही श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडे ती कार खरेदी करण्यासाठीची क्षमता आहे तरीसुद्धा कंपनी तुम्हाला काही गोष्टींमध्ये कार खरेदी पासून दूर ठेवू शकते. कारण ही कंपनी कारच्या विक्रीपेक्षा ब्रँडच्या स्टेटस व ब्रँडची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करते.
त्यामुळेच गेल्या 118 वर्षापासून या कारचे नाव हे कार निर्मिती क्षेत्रामध्ये किंवा कारच्या बाजारपेठेत नंबर एकला आहे. जर आपण या कंपनीच्या रोल्स रॉयस बोट टेल या कारची किंमत पाहिली तर ती भारतीय बाजारपेठेत तब्बल दोनशे कोटी रुपये किंमत आहे. या कंपनीचे सर्वात स्वस्त कार म्हणजेच ROLLS ROYAS WRAITH ही असून तिची भारतीय बाजारपेठेतील किंमत 6.22 कोटी रुपये आहे.
रोल्स रॉयस कारबद्दल असलेले महत्त्वाचे नियम
जितकी ही कार महाग आहेत तितकाच तिचा मेंटेनन्स खर्च देखील खूप प्रचंड प्रमाणात आहे. तसेच कंपनीचे अनेक स्ट्रिक्ट असे नियम असून ते कंपनीचे कर्मचारी तसेच ग्राहक यांच्या करिता आहेत.
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोल्स रॉयस कारची किंमत जितकी महाग आहे तितकाच त्याचा मेंटेनन्सचा खर्च पाहिला तर तो देखील अफाट आहे. म्हणजेच एकंदरीत हिचा मेंटेनन्स वर चार लाख रुपये इतका खर्च येतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर या गाडीचे तुम्हाला ऑइल बदलायचे राहिले तरी 52 हजार रुपये इतका खर्च येतो.
तसेच महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर या कारचे मेंटनस किंवा सर्विसिंग करायची असेल तर तुम्हाला ती रोल्स रॉयस सर्विस सेंटर किंवा शोरूम या ठिकाणीच करावी लागते. जर एखाद्या मालकाने जर दुसरीकडे सर्विसिंग केली तर त्या वेळेपासून रोल्स रॉयल्स कंपनी संबंधित ग्राहकाशी असलेले सर्विसिंग बद्दलचे नियम किंवा करार समाप्त करते. तसेच त्या कारची कुठल्याही प्रकारची जबाबदारी कंपनी घेणे बंद करते.
2- जर तुम्ही या कारची इंटिरियर पाहिले तर यामध्ये अनेक प्रकारचे डिझाईन बनवलेल्या असतात. याबद्दल देखील एक आचार्यकारक भाग म्हणजे प्रत्येक गाडीची डिझाईन एकच डिझायनर बनवतो व त्याचे नाव आहे मार्क कोर्ट हे होय. या डिझायनर व्यतिरिक्त या कारची डिझाईन दुसरी कोणतीही व्यक्ती बनवत नाही.
जर तुम्हाला या कारच्या डिझाईन मध्ये बदल करायचा असेल तर याकरिता तुम्हाला रोल्स रॉयस कारच्या डीलरशी चर्चा करून मार्क कोर्ट यांनाच बोलवावे लागेल. परंतु तुम्ही जर बाहेर कुठे गाडीचे डिझाईन मध्ये बदल केला तर त्या वेळेपासून रोल्स रॉयल्स कंपनी तुमच्या गाडीची सर्विस सर्विसिंग किंवा सेवा बंद करते.
3- या कारचे स्ट्रक्चर आणि लाईफ दोन्ही गोष्टी खूप मजबूत असतात. या गाडीचे सरासरी आयुष्य 80 ते 100 वर्षे इतके आहे. जर या गाडीच्या मालकाला कधीही वाटले की गाडी जुनी झाली आहे आणि ती आता चालवण्यासाठी चांगली नाही तर अशावेळी संबंधित गाडीचा मालक ती जुनी गाडी कंपनीला परत करू शकतो.
कारण या कंपनीची पॉलिसी आहे की त्यांची गाडी जुनी झाल्यानंतर कुठेतरी गॅरेज किंवा कोपऱ्यात पडून राहील हे कंपनीला मुळीच पसंत नाही. यामागे कंपनीचे धोरण आहे की अशा गोष्टींमुळे कंपनीच्या स्टेटसवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कंपनी जुन्या गाड्यांना देखील परत घेते.
4- गाडी महाग असल्यामुळे या गाडीत देण्यात येणाऱ्या सुविधा देखील तितक्याच प्रगत आहेत. यामधील एक महत्त्वाची सर्विस म्हणजे एसओएस म्हणजे टेली सर्विस होय. रोल्स रॉयस कारची ही सर्विस खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या गाडीचा अपघात झाला किंवा तुम्ही एखाद्या संकटात सापडलात अशावेळी या गाडीत असणाऱ्या अनेक प्रकारच्या बटनांच्या साह्याने तुम्ही आपत्कालीन नंबर वर फोन करून तुमच्याकरिता मदत मागवू शकतात.
तसेच या गाडीमध्ये असलेले सेन्सरमुळे संकटाच्या वेळी इमर्जन्सी फोन ऑटोमॅटिक लावले जातात. मालकाला फक्त त्या फोनच्या माध्यमातून तोंडी उत्तरे द्यावी लागतात. कंपनीच्या माध्यमातून ही सर्विस सातत्याने मॉनिटर केली जाते. तसेच या सर्विसबद्दल कंपनीकडून कॉल देखील येतात व मालकाला या कॉलचे उत्तर द्यावे लागते. हे नियम गाडी मालकाला फॉलो करावेच लागतात.
5- कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त सेवा मिळवण्याकरिता काही गोष्टी शेअर करणे खूप गरजेचे असते. रोल्स रॉयस कंपनी त्यांच्या सेवेच्या बदल्यात कार मालकाचे प्रायव्हसी आणि डेटा देखील घेते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुमचे करंट लोकेशन, कार सेन्सर च्या माध्यमातून मिळणारी माहिती,
ऑइलची स्थिती तसेच गाडीचे मायलेज आणि मेसेजेस इत्यादी डेटा हा रोल्स रॉयस कंपनी तिच्या मदर कंपनीला पाठवते. यामध्ये महत्त्वाचे असे जो व्यक्ती जास्त श्रीमंत असते तितकीच त्याची पर्सनल माहिती आणि डेटा सुरक्षित राहणे महत्त्वाचे असते.
6- महत्त्वाचे म्हणजे या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना मेकअप आणि परफ्युम वापरण्यास बंदी आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे काही प्रकारचा आर्टिफिशियल मेकअप आणि परफ्युम यांच्या वासामुळे या कारचा जो काही ऑरगॅनिक वास आहे त्यावर कुठल्याही प्रकारचा फरक पडू नये हे यामागचे धोरण आहे.
परंतु कारची डील करायचे असेल किंवा डिलिव्हरी असेल तर तेव्हा कंपनी कर्मचाऱ्यांना एकाच पद्धतीचा आणि एकाच कंपनीचा परफ्युम देते. कारण एकाच पद्धतीच्या किंवा एकाच प्रकारच्या परफ्युममुळे डीलिंग करताना आजूबाजूच्या वातावरणामध्ये एकसारखा सुवास असावा आणि कोणत्याही पद्धतीचा वाईट वास येऊ नये हे त्यामागचे धोरण आहे. यामुळे ग्राहकावर चांगले इम्प्रेशन किंवा प्रभाव पडतो.
7- एक महत्त्वाचे आहे की जो व्यक्ती एवढी महाग कार खरेदी करेल तो नक्कीच गर्भ श्रीमंत व्यक्ती असतो. त्यामुळे साहजिकच हे लोक स्वतः गाडी चालवत नाही तर त्याऐवजी ड्रायव्हर गाडी चालवण्यासाठी असतात. परंतु ही कार चालवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ड्रायव्हरला ठेवू शकत नाही.
जेव्हा एखादा ग्राहक कंपनीमध्ये गाडी खरेदी करण्यासाठी जातो तेव्हाच कंपनी विचारते की ही गाडी स्वतः चालवणार आहात की ड्रायव्हर चालवणार आहे. म्हणजेच कंपनीने ड्रायव्हर साठी देखील एक क्रायटेरिया तयार केलेला आहे. जर ड्रायव्हरने संबंधित क्रायटेरिया पूर्ण केला नाही किंवा संबंधित ड्रायव्हर क्रायटेरिया पूर्ण करणारा नसेल तर कंपनी संबंधित ग्राहकाला गाडी विकण्यास मनाई करू शकते. कारण हे कंपनी विक्री पेक्षा स्वतःच्या गाडीची इमेज सांभाळण्याकडे जास्त फोकस करते.
8- तसेच महत्त्वाचे म्हणजे रोल्स रॉयस कारला ग्राहकांच्या मागणीनुसार पेंट केले जाते. याकरिता विशेष प्रकारच्या लॅब म्हणजेच प्रयोगशाळेचा वापर केला जातो. यामध्ये ग्राहकाचे लोकेशन तसेच इतर बाबतीत पेंटला चेक केले जाते. त्यानंतर त्याला मंजूर केले जाते.
जर कंपनी त्या गाडीच्या पेंट साठी एवढा खर्च करते तर यामध्ये कंपनीने अट ठेवली आहे की रोल्स रॉयस कंपनी शिवाय तुम्ही दुसऱ्या ठिकाणी या गाडीला पेंट देखील करू शकत नाही. जर तुम्हाला त्या गाडीचा पॅन्ट चेंज करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला ऑथराईज डीलरशी संपर्क साधून अपॉइंटमेंट घेऊन पेंटमध्ये बदल करता येतो.
9- तसेच या कंपनीच्या कर्मचाऱ्यांबद्दल जर विचार केला तर बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी आपले मित्र किंवा नातेवाईक काम करत असतील तर त्यांच्या शिफारसीनुसार आपण त्या कंपनीमध्ये नोकरी मिळूवू शकतो. परंतु यामध्ये रोल्स रॉयस कंपनीचे नियम वेगळे असून ही कंपनी कधीही दोन ओळखीच्या व्यक्तींना नोकरी देत नाही.
कारण यामध्ये कंपनीचे म्हणणे आहे की जर दोन ओळखीचे व्यक्ती एकाच ठिकाणी नोकरीला किंवा कामावर असले तर ते कामापेक्षा इतर गोष्टींवर जास्त लक्ष देतात. परंतु ही कंपनी गाड्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करत नाही. ही कंपनी अशा कुठल्याही प्रकारची बाब किंवा गोष्ट करत नाही की त्यामुळे कंपनीचे स्टेटस खराब होईल.
10- बऱ्याचदा आपल्याला अनुभव आला असेल किंवा आपण पाहतो की बॅटरीला काही प्रॉब्लेम आल्यामुळे रस्त्यात गाडी बंद पडते. तसेच रस्त्यात बऱ्याचदा चोरी किंवा एक्सीडेंट यासारख्या संकटांना सामोरे जावे लागते. या सगळ्यांमुळे ही कंपनी गाडीची बॅटरीवर विशेष लक्ष पुरवते. ही कंपनी प्रत्येक गाडीच्या बॅटरीचा संपूर्ण डेटा स्वतःकडे ठेवते.
जर बॅटरी पूर्णपणे खराब होण्याच्या स्थितीत असते तेव्हा कंपनीकडून संबंधित गाडीच्या मालकाला रिप्लेसमेंट साठी अगोदरच सांगितले जाते. त्यानंतर तुम्ही रोल्स रॉयसच्या सर्विस सेंटर मधून बॅटरी बदलू शकतात. याकरिता तुम्हाला अपॉइंटमेंट घेणे गरजेचे असते. बिना अपॉइंटमेंट शिवाय तुम्ही गाडीची बॅटरी बदलू शकत नाही. कंपनीचा हा नियम गाडी मालकाला फॉलो करावाच लागतो.