ऑटोमोबाईल

कमी किंमत आणि तगडा परफॉर्मन्स असलेली कार असेल घ्यायची तर मारुतीची ‘ही’ कार ठरेल फायद्याची! देते तगडे मायलेज

Maruti New Generation Dzire 2024-: ज्या कुणाला कार घ्यायची असते असे व्यक्ती प्रामुख्याने कमी बजेटमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि चांगली फीचर्स व मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात. तसे पाहायला गेले तर भारतीय कार बाजारपेठेमध्ये असे अनेक कार आहेत की, ज्यांच्या किमती कमी आहेत व परफॉर्मन्स देखील उत्तम आहे.

परंतु कार घेताना निवड करण्यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. कारण जे लोक कमी बजेटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करतात ते कार घेताना त्या कारच्या असलेल्या मायलेज बाबत देखील खूप जागरूक व सावध असतात. या दृष्टिकोनातूनच कारची निवड करत असतात.

त्यामुळे तुम्हाला देखील कमीत कमी बजेटमध्ये चांगले मायलेज देणारी व सर्व प्रकारची उत्तम वैशिष्ट्ये असलेली कार जर घ्यायची असेल तर मारुती सुझुकीने नुकतीच लॉन्च केलेली नवीन जनरेशन डिझायर 2024 ही कार खूप फायद्याचे ठरते.

कमी बजेटमध्ये कार तुम्हाला उत्कृष्ट लूक तर देतेच परंतु उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि मायलेज देखील मिळण्यास मदत होईल. मारुती सुझुकीने या कारची किंमत अगदी सर्वसामान्य लोकांच्या बजेट पाहूनच ठेवली आहे. तुमचा जर सात ते आठ लाख रुपयांचा बजेट असेल तर तुमच्यासाठी ही कार खूप फायद्याची ठरू शकते.

मारुतीच्या या नवीन जनरेशन डिझायर 2024 कारला मिळाले आहेत पाच स्टार सेफ्टी रेटिंग
मारुती सुजुकी कंपनीची न्यू जनरेशन डिझायर 2024 ही कार नुकतीच लॉन्च करण्यात आलेली असून ही मारुती डिझायरची चौथ्या पिढीची कार समजली जाते. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची सुरक्षा ही होय. नुकत्याच पार पडलेल्या ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला पाच स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली असून ही अशा पद्धतीने रेटिंग मिळवलेली मारुतीची पहिलीच कार आहे.

कसे आहे या कारचे इंजिन?
चौथ्या पिढीच्या या डिझायरमध्ये कंपनीने नवीन 1.2- लिटर Z सिरीज पेट्रोल इंजिन दिले असून जे 80 बीएचपी पावर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. हे तीन सिलेंडर इंजिन असून जे नवीन पिढीच्या स्वीफ्टमध्ये देखील वापरले जात आहे.

या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे व तसेच कंपनीने सीएनजी प्रकार देखील यामध्ये सादर केला असून जो 68 बीएचपी पावर आणि 102 एनएम टॉर्क देतो.

काय आहेत या कारमधील इतर वैशिष्ट्ये?
मारुती सुझुकीने या नवीन डिझायरचे बाहेरील डिझाईन अपडेट केले असून यामध्ये स्लॅट्ससह एक नवीन ग्रील देण्यात आले आहे व त्यामध्ये एलईडी हेडलाईट, नवीन फ्रंट आणि रियर बंपर, ड्युअल टोन अलॉय व्हील, एलईडी टेल लाइट्समध्ये त्रिकोणी आकाराचा इन्सर्ट आणि शॉर्क फिन अँटेना इत्यादी वैशिष्ट्ये देखील दिले आहेत.

तसेच आतील भाग जर बघितला तर केबिनमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. विशेष म्हणजे कंपनीने या नवीन डिझायरमध्ये प्रथमच इलेक्ट्रिक सनरूफ उपलब्ध करून दिले आहे.

इतकेच नाही तर नवीन ड्युअल टोन इंटेरियर थीम, नऊ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेन्ट सिस्टम, फ्लॅट बॉटम स्टेरिंग व्हील, 360 डिग्री कॅमेरा तसेच क्रूझ कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारखी वैशिष्ट्ये देखील दिली आहेत.

कसे आहे या कारचे मायलेज?
मायलेज बद्दल बघितले तर या कारच्या पेट्रोल इंजिन मॉडेलला मॅन्युअल गिअर बॉक्स प्रकारामध्ये साधारणपणे 24.79 किलोमीटर पर लिटर आणि एटी म्हणजेच ऑटोमॅटिक गिअर बॉक्स या प्रकारामध्ये 25.71 किलोमीटर पर लिटर इतके मायलेज मिळते.

सीएनजी प्रकाराबद्दल बघितले तर ही कार सीएनजीमध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एक किलो सीएनजी मध्ये तब्बल 33.73 किलोमीटरचे मायलेज देते.

किती आहे नवीन जनरेशन डिझायर 2024 ची किंमत?
नवीन जनरेशन डिझायर 2024 ची किंमत जर बघितली तर ती सहा लाख आठ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत दहा लाख 14 हजार रुपये इतकी आहे. कंपनीच्या मते या सर्व किमती प्रस्ताविक असून 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध राहणार आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts