भारतीय कार बाजारपेठ सध्या अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या आकर्षक कारने गजबजलेली असून गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की अनेक प्रसिद्ध अशा कार उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळी वैशिष्ट्य असलेल्या व परवडणारे किमतीतल्या कार लॉन्च केलेले आहेत.
यामध्ये जवळपास सगळ्याच सेगमेंट मधील कारचा समावेश आहे. भारतातील प्रसिद्ध असलेली वाहन उत्पादक कंपनी महिंद्राने देखील अलीकडच्या कालावधीत त्यांच्या ऑफ रोड कार थारचे नवीन पाच डोर व्हेरिएंट लॉन्च केले आहे व या कारचे नाव महिंद्रा थार रॉक्स असे ठेवण्यात आलेले आहे.
त्यासोबतच दुसरी नामांकित कंपनी टाटा मोटरच्या माध्यमातून टाटाने आपली कुप एसयूव्ही Curvv लॉन्च केलेली होती.या कारचे देखील फीचर्स लोकांना माहित झालेले आहेत.
यामध्ये महिंद्रा थारच्या डिझेल ऑटोमॅटिक मॉडेल्स आणि टाटा कर्वच्या ऑटोमॅटिक मॉडेलची तुलना करून बघितली तर तुमच्यासाठी कोणती कार चांगली राहील?हे आपल्याला कळू शकते.
कसे आहे या दोन्ही कारचे इंजिन आणि पावर?
महिंद्रा थार रॉक्समध्ये 2.2 लिटर एम हॉक डिझेल इंजिन देण्यात आले आहे तर टाटाच्या कर्वेमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन आहे. थार रॉक्स 150 अश्वशक्ति आणि 330 एनएम टॉर्क जनरेट करते. तर टाटा कर्व 116 अश्वशक्ती आणि 260 एनएम टॉर्क जनरेट करते.
कसे आहेत दोन्ही कार मधील ब्रेक आणि टायर?
दोन्ही कारमध्ये 18 इंचाचे टायर देण्यात आलेले आहेत. टाटाच्या कर्वमध्ये डिस्क ब्रेक सिस्टम आहे तर महिंद्रा थार रॉक्स मध्ये समोर डीस्क ब्रेक सेटअप आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक सेटअप देण्यात आलेला आहे.
कसे आहेत ऑफ रोड फीचर्स?
जर आपण टाटाच्या कर्वचा ग्राउंड क्लिअरन्स बघितला तर तो 190 मीटरचा आहे. परंतु महिंद्रा थार रॉक्सचा ग्राउंड क्लिअरन्स अध्याप स्पष्टपणे सांगता येणार नाही. तसेच दोन्ही कारमध्ये हील डिसेंट कंट्रोल आणि हिल असिस्ट फीचर्स देण्यात आलेले आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही कारमधील फीचर्स
दोन्ही कार मध्ये सहा एअर बॅग देण्यात आलेले आहेत. ADAS वैशिष्ट्ये हे टाटा कर्व मध्ये उपलब्ध आहे तर महिंद्राच्या थार रॉक्समध्ये देण्यात आलेले नाही.
एवढेच नाही तर 360 डिग्री कॅमेरा देखील रॉक्स मध्ये उपलब्ध नाही. तसेच दोन्ही कारमध्ये पावर आणि व्हेंटिलेटेड सीट देण्यात आलेले आहेत. तसेच टाटा कर्वचे स्टेरिंग पावर ऍडजेस्टेबल आहे तर रॉक्सच्या या प्रकारात स्टेरिंगचे हे वैशिष्ट्य देण्यात आलेले नाही.