ऑटोमोबाईल

CNG Kit Installation: तुम्हाला तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बसवायची आहे का? आधी हे वाचा व नंतर निर्णय घ्या

CNG Kit Installation:- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे आपल्याला दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर सीएनजी वाहनांचा वापर देखील वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कारनिर्मिती आणि इतर वाहनांची निर्मिती केली जात आहे.

परंतु सीएनजी वाहनांची निर्मिती देखील केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये जर आपण सीएनजीच्या दृष्टीने बघितले तर ते सुरक्षित व इंधन कार्यक्षम आहेत परंतु किमतीच्या बाबतीत देखील कीफायतशीर असल्याने  मायलेज आणि लागणारा खर्च इत्यादींच्या बाबतीत नक्कीच परवडणारे आहेत.

सीएनजी कार घेण्याऐवजी बरेच व्यक्ती हे त्यांच्याकडे जर पेट्रोल कार असेल तर त्यामध्ये सीएनजी किट इन्स्टॉल करतात. परंतु अशा पद्धतीने सीएनजी किट जर तुम्हाला इन्स्टॉल करायचे असेल तर तुम्हाला यामध्ये काही गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे असते व काळजी देखील घ्यावी लागते.

 पेट्रोल कारमध्ये सीएनजी किट बसवा परंतु आधी या गोष्टी लक्षात घ्या

1- सर्वच कार सीएनजी किटला सपोर्ट करतात का?- सीएनजी किट बसवण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ती कोणत्या वाहनांना बसवता येते? हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तर याचे उत्तर असे देता येईल की सीएनजी किट फक्त पेट्रोल वाहनांमध्ये बसवता येणे शक्य आहे. जुने वाहन असेल तर त्यामध्ये तुम्ही सीएनजी किट बसवू शकत नाहीत.

जेव्हा तुमची कार सीएनजी किट बसवण्यासाठी सक्षम आहे किंवा योग्य आहे हे सिद्ध झाल्यानंतरच तुम्हाला कारचे जे काही आरसी असते ते अपडेट करावे लागते. तुम्ही तुमच्या कारचे आरसी अपडेट करण्यासाठी स्थानिक परिवहन प्राधिकरणाला भेट देणे गरजेचे असते.

कारण तुमच्या कारच्या आरसीमध्ये जो इंधन प्रकार नमूद केलेला असतो तो सीएनजी किट बसवल्यानंतर बदलावा लागतो. ही कागदपत्रांची प्रक्रिया जेव्हा पूर्ण होते तेव्हाच तुम्ही पेट्रोल वाहने सीएनजी वाहन म्हणून रस्त्यावर चालवू शकतात.

2- कोणती सीएनजी किट फायद्याचे ठरते?- सीएनजी किट मध्ये देखील दोन प्रकार येतात व यामध्ये कंपनी फिट सीएनजी किट आणि दुसरे म्हणजे आफ्टर मार्केट सीएनजी किट हे होय. यामध्ये जर आपण फॅक्टरी फिट केलेले सीएनजी किटच्या दृष्टिकोनातून बघितले तर या किट तुलनेने महाग असतात.

परंतु यांचा एक फायदा म्हणजे ते ओईएम वॉरंटीसह येतात व कंपनीचे जे काही सेवा नेटवर्क असते त्याद्वारे ते सपोर्टेड असतात. ज्याप्रमाणे शोरूम मधून आपण वाहन घेतो व त्या वाहन उत्पादकाकडून खरेदी केलेल्या कोणत्याही वाहनाप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्याला मोफत कॉम्प्लिमेंटरी सर्विस मिळते.अगदी तशीच सर्विस सीएनजी वाहनांना देखील मोफत मिळते.

दुसरा प्रकार म्हणजे आफ्टर मार्केट सीएनजी किट हे होय.या प्रकारची किट अधिक परवडणाऱ्या असतातच आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते अधिकृत सीएनजी रेट्रो किट डीलर्स कडेच उपलब्ध होतात. यांना देखील ओईएम आणि डीलर करून वारंटी मिळत असते. सीएनजी कन्वर्जन किट बसवण्याकरिता साधारणपणे 60000 पर्यंतचा खर्च अपेक्षित असतो.

3- कार सीएनजीमध्ये बदला परंतु इन्शुरन्स कंपनीला कन्फर्म करा तुमची कार मध्ये सीएनजी किट बसवल्यानंतर तुमच्या कारचा इन्शुरन्स ज्या कंपनीकडे असेल त्या इन्शुरन्स कंपनीला त्याबाबत कळवणे खूप गरजेचे असते.

जरी सीएनजी इंधनाची किंमत पेट्रोल पेक्षा कमी असली तरी देखील इन्शुरन्स प्रीमियम मात्र पारंपारिक वाहनांपेक्षा सीएनजी वाहनांचा जास्त आहे. तेव्हा तुमची कार तुम्ही सीएनजी मध्ये कन्व्हर्ट कराल तेव्हा आरसी नोंदणी केल्यानंतर लगेच तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीला याबाबत कळवणे गरजेचे असते.

4- सीएनजी मुळे येऊ शकतात या समस्या आपल्याला माहित आहे की सीएनजी हे पेट्रोल पेक्षा स्वस्त असल्यामुळे  कमी खर्चात गाड्या चालवता येणे शक्य होते. परंतु सीएनजी वाहनांसाठी एक नकारात्मक गोष्ट अशी असते की या कारला वारंवार सर्विसिंग करण्याची गरज भासते.

तसेच सीएनजी टाकीमुळे कारचा बूट स्पेस देखील कमी होतो. दुसरे म्हणजे सीएनजी वाहनांची कार्यक्षमता कमी असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे पेट्रोल कारच्या तुलनेमध्ये सीएनजी कारची कामगिरी कमी असते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts