ऑटोमोबाईल

भारतात येत आहे सौर उर्जेवर चालणारी पहिली इलेक्ट्रिक कार! प्रतिकिमी चालवण्याचा खर्च येईल 0.5 रुपये

Eva Solar Car:- वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने अनेक प्रगत वैशिष्ट्य असलेल्या अत्याधुनिक अशा कार सध्या मार्केटमध्ये सादर करण्यात येत आहेत.

यामध्ये जर आपण बघितले तर अनेक नामवंत अशा कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार देखील आता सादर करण्यात येत असून पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेमध्ये या कार नक्कीच फायद्याच्या ठरताना दिसून येत आहेत.

परंतु त्याही पुढे जात आता पुणे येथील स्टार्टअप वायवे मोबिलिटी येणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये भारतातील पहिली सौर उर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार ‘इवा’ सादर करण्याची शक्यता आहे व ही कॉम्पॅक्ट आकाराची इलेक्ट्रिक कार येणाऱ्या भविष्यकाळात शहरी प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकणार आहे.

या कारमुळे इंधन खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळण्यास मदत होईल. त्यामुळे या लेखात आपण थोडक्यात या कार बद्दलची माहिती बघणार आहोत.

काय असतील या सोलर कारचे मुख्य वैशिष्ट्ये?
ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 250 किमी पर्यंतचे अंतर कव्हर करू शकते व सौर ऊर्जेच्या माध्यमातून दरवर्षी 3000 किमीची मोफत राईड सुविधा देखील देते.

तसेच या कारमध्ये उच्च व्होल्टेज पावरट्रेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे ही कार केवळ पाच मिनिटात 50 किमी अंतर कापू शकते.

जर आपण या कारच्या ऑपरेशनची म्हणजे चालवण्याची किंमत प्रति किलोमीटर नुसार बघितली तर ती फक्त 0.5 रुपये इतकी आहे. त्या तूलनेत जर आपण पेट्रोल कारची किंमत बघितली तर ती प्रतिकिमी पाच रुपये इतकी आहे.

ही कार प्रामुख्याने शहराच्या प्रवासाकरिता डिझाईन करण्यात आलेली आहे व ज्या व्यक्तींचा रोजचा प्रवास पस्तीस किलोमीटर पर्यंत असेल त्यांच्यासाठी ही कार उत्तम पर्याय ठरणार आहे.या कारमध्ये कंपनीने स्मार्टफोन इंटिग्रेशन, व्हेईकल डायग्नोस्टिक, रिमोट मॉनिटरिंग आणि ओव्हर द इयर अपडेट सारखी प्रगत वैशिष्ट्ये दिली आहेत.

लवकरच सुरू होणार प्री बुकिंग
Eva च्या अधिकृत संकेतस्थळावर या कारची प्री बुकिंग लवकर सुरू होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.. जानेवारी 2025 मध्ये नवीन दिल्ली येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी शोमध्ये ही कार प्रदर्शित केली जाईल अशी एक शक्यता आहे.

वायवे मोबिलिटी कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ निलेश बजाज यांनी याबद्दल म्हटले की, इवा ही कार प्रगत अशा ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.

या कारला सौर ऊर्जा आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे व त्यामुळे ही कार शहरी गतिशीलतेसाठी एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येईल व कुटुंबांसाठी ही एक आदर्श कार बनू शकते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts