iPhone 14 Discount : येत्या काही दिवसात आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर येत आहे. जर तुमचाही आयफोन खरेदीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक कामाची बातमी आहे. ती म्हणजे आयफोन 14 प्लस वर एक जबरदस्त डिस्काउंट ऑफर सुरू झाला आहे. या ऑफरचा लाभ घेऊन ग्राहकांना या हँडसेटच्या खरेदीवर तब्बल 24 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.
हो, तब्बल 24 हजार रुपयांची बचत करता येणार आहे. यामुळे जर तुम्हालाही हा हँडसेट खरेदी करायचा असेल तर या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकणार आहात.
मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरच हा हँडसेट खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण या ऑफरची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
कुठे सुरू आहे ही ऑफर
ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर नेहमीच नवनवीन ऑफर लागलेल्या असतात. सध्या अशीच एक ऑफर या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. या ऑफर अंतर्गत iPhone 14 Plus हा हँडसेट स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आयफोन 14 प्लसची ओरिजनल किंमत ही 79 हजार 900 रुपये एवढी आहे. मात्र तुम्ही जर flipkart वरून हा हँडसेट खरेदी केला तर तुम्हाला 29 टक्के डिस्काउंट मिळणार आहे.
फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आयफोन 14 प्लस या हँडसेट वर 29 टक्के डिस्काउंट दिला जात असून या डिस्काउंट ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन फक्त आणि फक्त 55 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकणार आहात.
म्हणजेच फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या या ऑफरमुळे तुमचे 24 हजार रुपये वाचणार आहेत. विशेष म्हणजे फ्लिपकार्ट या हँडसेटच्या खरेदीसाठी एक्सचेंज ऑफर देखील देत आहे.
एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना एक्स्ट्रा 48 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे. मात्र एक्सचेंज ऑफरअंतर्गत ठरवली जाणारी किंमत ही तुमच्या जुन्या आयफोन मॉडेलच्या कंडीशन वर अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, जर तुम्हाला iPhone 14 Plus वर सुरू असणाऱ्या 29 टक्के डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर हा हँडसेट खरेदी करावा लागणार आहे. कारण की ही ऑफर मर्यादित टाईम पिरियडसाठी सुरू राहणार आहे.