Kia EV6: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महिंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी धोनी क्रिकेटमुळे नाहीतर एका इलेक्ट्रिक कारमुळे चर्चेत आला आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या महिंद्रसिंग धोनीने एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो धोनीने Kia EV6 ही भन्नाट फीचर्ससह येणारी इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. यापूर्वी भारतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योजक मुकेश अंबानी, रितेश देशमुख, माधुरी दीक्षित यांनी देखील ही भन्नाट कार कार खरेदी केली आहे.
या कारची किंमत 60.95 लाख रुपये असून या कारला 708 रेंज देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कार मोबाईल फोनपेक्षा चार्ज होण्यासाठी कमी वेळ घेते. ही इलेक्ट्रिक कार केवळ 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते.
या कारमध्ये 77.4 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. या कारमध्ये 2 मोटर सेटअप आहेत. कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, दोन मोठे वक्र डिस्प्ले, ADAS (लेटेस्ट ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम), 14-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टीम यासारखी हायटेक फीचर्स आहेत. भारतात फार कमी लोकांनी खरेदी केली आहे. पुन्हा एकदा या कारचे बुकिंग सुरू झाले आहे.
हे पण वाचा :- Ola S1 Air स्कूटर बनणार थिएटर ! कंपनी देणार ‘हे’ भन्नाट फीचर्स