अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Automobile :- पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक कार, बाइक यांकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच देशात इलेक्ट्रिक कार सेगमेंट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दरम्यान आता लवकरच Kia मोटर्स आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. कोरियाची ऑटोमोबाइल निर्माता कंपनी किआने नुकतेच भारतात Kia EV6 नेमप्लेट ट्रेडमार्क केले आहे. कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे.
ही कार भारतात जून महिन्यात लाँच केली जावू शकते. दरम्यान किआ मोटर्सने EV6 Light, EV6 Earth, EV6 Water आणि EV6 Air नावाने आपली इलेक्ट्रिक कारसाठी ट्रेडमार्क केले आहे.
जबरदस्त फीचर्स :- Kia EV6 मध्ये १९ इंचाचा अलॉय व्हील्स, १२.३ इंचाचे डिजिटल कन्सोल, १२.३ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम, अडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस चार्जिंग, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, रिमोट स्मार्ट पार्किंग असिस्ट, लेवल २ हायवे ऑटोनॉमी ड्रायविंग आणि हायवे ड्रायविंग असिस्टेंस सिस्टम सह अनेक स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
सुपरफास्ट :- किआ ईव्ही ६ एक इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर आहे. ज्याला हॅचबॅक आणि एसयूव्हीचे कॉम्बो मानले जात आहे. अमेरिकी मार्केटमध्ये असलेल्या Kia EV6 चा टॉप स्पीड १८८ किमी प्रति लीटरपर्यंत आहे. याला फक्त ५.१ सेकंदात शून्य ते ९६ किमी प्रति तास वेग पकडता येतो. या कारची रेंज ५१० किमी पर्यंत असणार आहे.
जाणून घ्या किंमत Kia मोटर्सने आपली नवीन ७ सीटर SUV लॉंच केली आहे. ६ आणि ७ सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. किआ कारन्सला इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत फक्त ८.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे.