KTM Upcoming Bike : KTM ही आघाडीची दुचाकी कंपनी सतत आपल्या नवनवीन बाईक लाँच करत असते. स्पोर्टी लूक आणि शानदार डिझाईनमुळे कंपनीच्या सर्व बाईक ग्राहकांना भुरळ पाडत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनीच्या बाईक्सची मागणी भारतीय बाजारपेठेत वाढत आहे.
अशातच आता कंपनी KTM 250 Adventure आपली नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. अप्रतिम फीचर्स अन् भन्नाट मायलेजसह तुम्ही ती खरेदी करू शकता. यात लिक्विड-कूल्ड इंजिन शिवाय इतर अनेक खास फीचर्स दिले जाणार आहे.
KTM ची सर्वात कमी किमतीतील अॅडव्हेंचर बाईक
कंपनीने आपल्या KTM 250 अॅडव्हेंचर बाईकच्या सीटची उंची 855mm वरून 834mm इतकी वाढली आहे. 250 अॅडव्हेंचर ही सध्या भारतीय पोर्टफोलिओमधील सर्वात कमी किमतीतील एक अॅडव्हेंचर बाइक आहे. 855 मिमी उंचीसह, अगदी कमी उंची असणाऱ्या लोकांसाठी ती चालवणे सोपे नाही.
इंजिन
KTM 250 ADV ‘V’ हे लिक्विड-कूल्ड 249cc सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित असणार आहे जे 9,000rpm वर 30hp आणि 7,500rpm वर 24Nm टॉर्क निर्माण करेल. कंपनीच्या 390 अॅडव्हेंचर प्रमाणे, या बाईकला उत्तम ऑफ-रोडिंग नियंत्रणासाठी ABS निष्क्रिय करण्याचा पर्याय मिळत आहे.
किंमत
या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 250 Adventure V ची किंमत मानक बाईक प्रमाणेच आहे, त्यामुळे तिची किंमत 2.47 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
उपलब्ध असणार एलईडी हेडलाइट
200 ड्यूकमध्ये आता LED हेडलाइट मिळविण्यासाठी सज्ज असणार आहे, जे पूर्वी फक्त 250 आणि 390 Duke वर पाहण्यात आले होते. एलईडी हेडलाइटने सुसज्ज असणाऱ्या नवीन आवृत्तीची किंमत 1.97 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी असणार आहे. दरम्यान सर्वात महत्त्वाचे म्हणजे 200 Duke ही KTM ची पहिली मोटारसायकल होती जी 2012 मध्ये कंपनीने भारतात सादर केली गेली.