Maruti XL6 : तुम्ही सध्या उत्तम 7 सीटर कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला उत्तम अनुभवासह उत्तम फीचर्स देखील देते. तसेच याची किंमत देखील खूप खास आहे.
सध्या मार्केटमध्ये अनके 7 सीटर कार उपलब्ध आहेत, यामध्ये मारुती एर्टिगा, किया केरेन्स, रेनॉल्ट ट्रायबर आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये टोयोटा इनोव्हा या नावांचा समावेश आहे.
पण प्रत्येकजण हे विसरतो की मारुतीकडे आणखी एक प्रीमियम 7 सीटर कार आहे जी तुम्हाला प्रवासाचा आरामदायी अनुभव देते. ही कार म्हणजे मारुती XL6. कंपनी त्याची प्रीमियम डीलरशिप Nexa द्वारे विक्री करते.
मारुती सुझुकी XL ही प्रीमियम 7 सीटर कार आहे जी कंपनीने अशा ग्राहकांसाठी बनवली आहे ज्यांना प्रीमियम वैशिष्ट्यांचा आनंद घ्यायचा आहे. जिथे मारुती एर्टिगा टॅक्सी म्हणून धावताना दिसत आहे. तिथे XL 6 फक्त वैयक्तिक वाहन म्हणून पहिली जाते. त्यामुळेच लोकांना ही 7 सीटर एसयूव्ही खरेदी करायला आवडते.
मात्र, विक्रीच्या बाबतीत मारुती XL6 खूप मागे आहे. पण तरीही ही कार तुम्हाला खूप चांगला अनुभव देऊ शकते. जर तुम्हाला प्रीमियम अनुभव हवा असेल तर तुम्ही Ertiga ऐवजी Maruti XL6 खरेदी करू शकता. यामध्ये विविध स्पेस आणि फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये कोणते खास फीचर्स आहेत पाहूया.
मारुती सुझुकी XL6 फीचर्स
मारुती सुझुकी XL6 मध्ये पेट्रोल सोबतच CNG इंजिनचा पर्याय आहे. यात 1.4 लिटर पेट्रोल आणि CNG इंजिन आहे. सीएनजी असल्याने ते खूप चांगले मायलेज देते. यामध्ये तुम्हाला प्रति लिटर 30 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळते.
मारुती सुझुकी XL6 किंमत
जर तुम्ही आता ही कार खरेदी करायला गेलात तर तुम्हाला ती अंदाजे 11.6 लाख ते 14.77 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत मिळेल. ही कार Ertiga पेक्षा किंचित जास्त महाग आहे. तथापि, त्याची वैशिष्ट्ये खूप प्रीमियम आहेत आणि त्याची रोड उपस्थिती देखील Ertiga पेक्षा खूप चांगली आहे.