भारतीय कार बाजारपेठेचा दृष्टिकोनातून जर पाहिले तर महिंद्रा तसेच टाटा आणि सिट्रोएन सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट फीचर असलेल्या कार लॉन्च करण्यात आलेले आहेत व ग्राहकांमध्ये त्या लोकप्रिय देखील आहेत.
भारतीय कार बाजारपेठेमध्ये या तीनही कंपन्यांचा दबदबा राहिलेला असून ग्राहकांमध्ये देखील या कार खरेदी करण्यासाठी आपल्याला प्रेफरन्स दिसून येतो. यापैकी महिंद्रा आणि टाटा गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय ग्राहकांच्या सेवेशी असून अगदी सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा कार
या कंपन्यांनी आजपर्यंत लॉन्च केलेले आहेत व एसयूव्ही सेगमेंट मधील कार निर्मितीत देखील या कंपन्या अग्रगण्य अशा आहेत. हीच त्यांची परंपरा कायम राखत या कंपन्या ऑगस्ट महिन्यामध्ये आकर्षक वैशिष्ट्य असलेल्या एसयूव्ही गाड्या बाजारात आणणार आहेत. त्याच विषयाची माहिती आपण या लेखात घेऊ.
ऑगस्टमध्ये लॉन्च होणाऱ्या दमदार SUV
2-Tata Curvv EV- टाटा कंपनीच्या माध्यमातून ही कार 7 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च करण्यात येणार असून या इलेक्ट्रिक कार असणार आहे व या इलेक्ट्रिक एसयूव्ही कुपची रेंज 600 किलोमीटर इतकी राहील. या कारमध्ये कनेक्टेड लाइटिंग तसेच फ्लशडोर आणि हँडल आणि ईव्ही व्हेरिएंटसाठी युनिट क्लोज्ड ग्रील देण्यात आले आहेत.
कर्व्ह ईव्हीच्या आतील भागामध्ये 12.3 इंचाची टचस्क्रीन, 10.25 इंचचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हेंटिलेटर सीड्स आणि पॅनोरमिक सनरुफ सारखे फीचर देखील देण्यात आलेले आहेत.
तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहा एअरबॅग, 360 डिग्री कॅमेरा आणि लेव्हल दोन ADAS सारखे महत्त्वाचे वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
2- महिंद्रा
थार रॉक्स(ROXX)- महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून येऊ घातलेल्या या कारची प्रतीक्षा गेल्या कित्येक दिवसापासून असून ही गाडी Thar ROXX या नावाने ओळखली जाणार आहे.महिंद्राच्या माध्यमातून ही कार 15 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च करण्यात येणार असून या गाडीमध्ये देण्यात आलेले फीचर्स पाहिले तर या कारचा इंटेरियर स्पेस आणि एक्सेसिबिलिटी उत्तम पद्धतीने करण्याकरिता व्हिलबेसला वाढवण्यात आलेले आहे. महिंद्राच्या या गाडीमध्ये 2.0 लिटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन किंवा 2.2 mHawk डिझेल इंजन यामध्ये असण्याची शक्यता आहे
व याला सहा स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बरोबर जोडले जाईल. या कारमध्ये दोन रंगाचे ब्लॅक ब्राऊन इंटेरियर, मोठ्या आकाराचे रियल सीट्स, वाढलेला बूट स्पेस आणि मोठी टच स्क्रीन यामध्ये असणार असून प्रीमियम साऊंड सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, ADAS आणि कीलेस एन्ट्री सारखे फीचर्स पाहायला मिळतील तसेच या गाडीची किंमत 16 लाख रुपयांपासून ते 22 लाख रुपयांपर्यंत असू शकते.