Mahindra Thar 5-Door : भारतीय कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपली नवीन 5-डोर थार ऑफ-रोडर SUV बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनी स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात ही कार सादर करू शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनी 15-16 ऑगस्ट 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत एक कार्यक्रम आयोजित करत आहे आणि या कार्यक्रमात कंपनी नवीन 5-डोर थार ऑफ-रोडर SUV बाजारात सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणतेही माहिती शेअर केलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात नवीन 5-डोर थार ऑफ-रोडर SUV मारुती सुझुकी जिमनीशी स्पर्धा करणार आहे. जी या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार आहे.
थारच्या 3-डोर व्हर्जनच्या तुलनेत 5- डोर थारचा व्हीलबेस सुमारे 300 मिमीने लांब असेल. स्पाय पिक्चरमध्ये दिसून येत आहे कि बहुतांश फीचर्स 3-डोर व्हर्जनप्रमाणेच असतील. कंपनी AdrenoX सॉफ्टवेअर, सनग्लास होल्डर आणि फ्रंट आणि सेंटर आर्मरेस्टसह अपडेटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देऊ शकते.
5-डोर महिंद्रा थारचे डिझाइन आणि स्टाइल देखील त्याच्या 3-डोरच्या व्हर्जनसारखेच असेल. ही कार राउंड हेडलॅम्प, हाय व्हील आर्च आणि टेलगेट माउंटेड स्पेअर व्हीलसह सिग्नेचर बॉक्सी स्टॅन्ससह येईल. यात वेगवेगळ्या बॉडी पॅनल्ससह नवीन अलॉय व्हील मिळू शकतात.
नवीन थार 5-डोर एसयूव्हीला सध्याच्या 3-डोरच्या व्हर्जनमधून 2.2-लीटर डिझेल आणि 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 370Nm/172bhp आणि 300Nm/130bhp चे आउटपुट अनुक्रमे उपलब्ध असेल. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. 4X2 आणि 4X2 ड्राइव्हट्रेन पर्यायांसह आलेल्या 3-डोरच्या थार प्रमाणेच, 5- डोर महिंद्रा थारला देखील दोन्ही पर्याय मिळतील. 4X4 सिस्टम केवळ अधिक शक्तिशाली 2.2L डिझेल इंजिनसह उपलब्ध असेल.
महिंद्रा थार 5-डोर त्याच्या 3-डोरच्या व्हेरियंटपेक्षा महाग असणार आहे. या बाबतचा इतर तपशील कंपनीकडून नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ही एसयूव्ही मारुती जिमनी 5 डोअरला टक्कर देईल, ज्यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
हे पण वाचा :- भारतात नोटाबंदीचा इतिहास काय ? केव्हा आणि किती वेळा झाली नोटाबंदी, जाणून घ्या एका क्लीकवर सर्वकाही ..