Mahindra Thar Electric : काही दिवसांपूर्वी महिंद्राने आपली थार बाजारात दाखल केली आहे. तेव्हापासून या कारला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या कारमध्ये कंपनीने अनोखे फीचर्स आणि आकर्षक लूक दिला आहे. अनेकजणांना या कारचा लूक खूप आवडतो. कंपनीही थारचे वेगवेगळे डिझाइन आणत असते.
अशातच आता थारप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आता थारचे इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणणार आहे. नुकतेच या कारचे सोशल मीडियावर बिंबल डिझाईनद्वारे रेंडर्स जारी करण्यात आले आहेत. हे रेंडर्स पाहून तुम्हीही कारच्या मोहात पडाल. 15 ऑगस्ट रोजी महिंद्रा दक्षिण आफ्रिकेत एक कार्यक्रम असून कंपनी ही कार सादर करणार आहे.
नवीन थारचे बिंबल डिझाईनद्वारे रेंडर्स जारी
थारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच झाले तर त्याचे मॉडेल कसे असेल याबाबत बिंबल डिझाईन्सकडून काही रेंडर्स जारी करण्यात आले होते. 2024 पर्यंत थारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट बाजारात दाखल होईल असा त्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत त्यांनी या ऑफरोड एसयूव्हीचे काही रेंडर (फोटो) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जारी करण्यात आले आहे. हे रेंडर्स पाहिल्यानंतर, तुम्हालाही भुरळ पडेल.
3D रेंडर
हे लक्षात घ्या की बिंबल डिझाईन्स वाहनांचे 3D रेंडर रिलीज करत असते. एकंदरीतच सांगायचे झाले तर भविष्यात एखादी कंपनी आपले मॉडेल कसे तयार करेल याबद्दल एक सूचना किंवा कल्पना देत असते. थार इलेक्ट्रिक व्हर्जनच्या रिलीझ केलेल्या रेंडरमध्ये, या ऑफरोड एसयूव्हीचे डिझाइन सर्व बाजूंनी पाहायला मिळत आहे. या रेंडरमध्ये, याला सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त आकर्षक लुक दिला आहे. समोर, SUV ला लोखंडी जाळीमध्ये आणि वर मोठ्या LEDs मिळत असून ते ट्यूबलाइटसारखे आहे.
मिळणार अनेक जबरदस्त फीचर्स
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात टिल्ट-अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील, पॉवर विंडो, रिमोट फ्लिप कीसह सेंट्रल लॉकिंग, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM तसेच ड्रॅग रेझिस्टंट इन्फोटेनमेंट स्क्रीन (Android Auto आणि Apple CarPlay साठी समर्थनासह), प्लास्टिक फ्लोर मॅट्स, पाणी आणि धूळ प्रतिरोधक यांचा समावेश करण्यात आला आहे. नियंत्रण स्विचसह ड्रेन प्लग सारखी फीचर्स यात समाविष्ट करण्यात आली आहेत. या कारचे इंटीरियर वॉटर फ्रेंडली केले आहे. या कारमध्ये क्रूझ कंट्रोल, EBD सह ABS, ड्युअल एअरबॅग्ज, हिल-होल्ड दिले आहे.