Mahindra Company New Car : महिंद्रा अँड महिंद्रा ही देशातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेल्या आहेत. दरम्यान नजीकच्या भविष्यात जर तुमचेही कार घेण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे.
खरे तर या नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच अनेकांनी आपल्या नवीन वाहनाचे स्वप्न पूर्ण केलेले असेल. नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी नवीन गाड्या खरेदी केलेल्या असतील. मात्र काही लोकांना येत्या काही महिन्यात नवीन कार खरेदी करायची आहे.
दरम्यान अशाच निकटवर्ती भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे बाजारात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरच एक नवीन एसयूव्ही लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी टाटा नेक्सन या गाडीला टक्कर देण्यासाठी बाजारात महिंद्रा अँड महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय XUV300 कारचे फेसलिफ्ट वर्जन येत्या काही दिवसांत लॉन्च केले जाणार आहे. ही लोकप्रिय कार फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये लॉन्च होणार अशी माहिती समोर आली आहे.
यामुळे जर तुम्हालाही येत्या एक-दोन महिन्यात नवीन कार खरेदी करायची असेल, विशेषतः महिंद्रा कंपनीची कार खरेदी करायची असेल तर ही नव्याने लॉन्च होणारी गाडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. दरम्यान आता आपण या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीचे फीचर्स थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या नव्याने लॉन्च होणाऱ्या फेसलिफ्ट वर्जन मध्ये कंपनीकडून अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. या कारच्या एक्सटेरियरमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. या गाडीला बंपरमधून अद्ययावत ग्रिलसह एलईडी हेडलॅम्पचा नवीन सेट दिला जाणार आहे.
मागील बाजूस, स्लीक कनेक्ट केलेले एलईडी टेल लॅम्प, पुन्हा डिझाइन केलेले टेलगेट आणि नेमप्लेटसह नवीन मागील बंपर असू शकतात. याशिवाय आगामी महिंद्राच्या कारमध्ये अलॉय व्हीलचा नवा सेटही मिळू शकतो.
XUV300 फेसलिफ्टमध्ये नवीन 10.25-इंचाचा पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, महिंद्राच्या नवीनतम इंटरफेससह फ्री-स्टँडिंग 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अॅड्रेनॉक्स कनेक्टेड कार तंत्रज्ञान, पॅनोरॅमिक सनरूफ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या गाडीची किंमत किती राहणार याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच याबाबत माहिती दिली जाणार आहे.