Mahindra Upcoming EV Cars : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून आतापर्यंत भारतीय ऑटो मार्केटमध्ये एकच इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कारमध्ये कंपनीकडून मजबूत बॅटरी पॅक आणि शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.
आता इलेक्ट्रिक कार वाढती मागणी लक्षात घेता महिंद्रा कार कंपनीकडून आगामी काळात त्यांच्या चार इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत. या इलेक्ट्रिक कार 500 किमीपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असतील.
1. महिंद्रा BE.05
महिंद्रा कार कंपनीकडून 2025 पर्यंत त्यांची BE.05 इलेक्ट्रिक कार भारतात सादर केली जाईल. INGLO स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर ही कार विकसित केली जाईल.
महिंद्राकडून या इलेक्ट्रिक कारमध्ये 80 kWh चा बॅटरी पॅक दिला जाईल. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 500 किमीपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. कारचे डिझाईन अतिशय आकर्षक बनवले जाईल.
2. महिंद्रा XUV.e9
महिंद्रा कार कंपनीकडून त्यांची XUV.e9 इलेक्ट्रिक कार 2025 च्या मध्यापर्यंत लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक बाजारपेठेत या कारची चाचणी घेताना ती स्पॉट झाली आहे.
ही इलेक्ट्रिक कार देखील INGLO स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवरच तयार केली जाईल. कारमध्ये 80 kWh बॅटरी पॅक दिला जाईल. ही कार 435-450 किमी रेंज देण्यास सक्षम असेल.
3. Mahindra XUV.e8
महिंद्रा कार कंपनीकडून XUV.e8 इलेक्ट्रिक कार 2024 च्या अखेरीस लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारमध्ये 80 kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. टू-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये XUV.e8 इलेक्ट्रिक कार उपलब्ध असेल.
4. महिंद्रा XUV300 EV
महिंद्रा कार उत्पादक कंपनीच्या XUV300 एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून या एसयूव्ही कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे.
XUV300 फेसलिफ्टवर इलेक्ट्रिक कारचे डिझाईन असेल. कारमध्ये 35kWh बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. कारची अंदाजे एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपये असेल. XUV300 EV लॉन्च होताच नेक्सॉन EV शी स्पर्धा करेल.