ऑटोमोबाईल

Mahindra EV : मार्केट तापणार…! यावर्षी नवीन इलेक्ट्रिक कार सोबत महिंद्रा करणार दमदार एंट्री…

Mahindra EV : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहन कंपन्यांनी आता आपली भूमिका बदलली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असून ग्राहक आता इलेकट्रीक वाहनांकडे वळत आहेत, अशातच वाहन कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता त्या क्षेत्रातकडे वळताना दिसत आहेत.

सध्या मार्केटमध्ये एका पेक्षा एक वाहने आहेत. अशातच भारतातील बड्या ऑटो कंपन्यांमध्ये गणली जाणारी महिंद्रा लवकरच आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. महिंद्राची ही कार मार्केटमध्ये आल्यानंतर लोकांमध्ये खळबळ माजवताना दिसेल, महिंद्राची ही कार उत्तम फीचर्ससह मार्केटमध्ये एंट्री करताना दिसेल.

महिंद्राची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आल्यानंतर मार्केटमध्ये धमाका पाहायला मिळणार आहे. ही EV कार मार्केटमध्ये येताच मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होईल.

या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास आतील भागात मोठा फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, डिजिटल क्लस्टर, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक एसी आणि पॅनोरॅमिक सनरूफ दिले जाऊ शकतात. आगामी कार एका चार्जवर 350-400 किमीची रेंज देऊ शकते.

ही EV कार जवळपास 500 किमीच्या रेंजसह बाजारात खळबळ माजवताना दिसेल. त्याची पॉवरट्रेन स्पेसिफिकेशन्स काय असणार आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. पण ही EV कार खूपच जबरदस्त असल्याचे बोलले जात आहे, या इलेक्ट्रिक एसयूव्हीला आतील भागात फ्री-स्टँडिंग ड्युअल डिजिटल स्क्रीन मिळण्याची अपेक्षा आहे.

महिंद्राची इलेक्ट्रिक XUV 300 EV थेट Tata Nexon EV शी स्पर्धा करताना दिसेल. ही इलेक्ट्रिक SUV जून 2024 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास याच्या बेस व्हर्जनची किंमत सुमारे 15 लाख रुपये आणि टॉप-एंड ट्रिमची किंमत सुमारे 17 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts