ऑटोमोबाईल

Mahindra XUV300 : लवकरच लॉन्च होणार महिंद्राची शानदार एसयूव्ही, मिळणार ‘हे’ खास फीचर; जाणून घ्या किंमत

Mahindra XUV300 : सध्या भारतीय बाजारात एसयूव्हीची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपली शानदार एसयूव्ही लाँच करत आहेत. बाजारातील हीच मागणी लक्षात घेता आता महिंद्रा कंपनी आपली नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे.

लवकरच महिंद्रा आपल्या परवडणाऱ्या SUV Mahindra XUV300 चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल देशांतर्गत बाजारामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या ग्राहकांना या एसयूव्हीमध्ये एक खास फीचर मिळणार आहे.

महिंद्राच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कंपनी पॅनोरामिक सनरूफ देत असून जे सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात येत आहे.कंपनीने यापूर्वी ही सुविधा या एसयूव्हीमध्ये उपलब्ध करून दिली होती, मात्र ती सिंगल-पेन सनरूफ होती.अनेकजण या फीचरची वाट पाहत होते.

मागील काही दिवसांपासून सनरूफ हे एक फिचर म्हणून समोर आले आहे, ज्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच Hyundai ने आपली सर्वात स्वस्त SUV Exter लाँच केली असून ज्यात सिंगल पॅन व्हॉईस सक्षम सनरूफ देण्यात आले आहे. तसेच यात इतरही अनेक मॉडेल्स आहेत ज्यात सनरूफचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

हे लक्षात घ्या की ही SUV पॅनोरॅमिक सनरूफसह येणारे सेगमेंटमधील पहिले वाहन असणार आहे. तसेच कंपनी या एसयूव्हीच्या बाह्य आणि आतील भागातही मोठे बदल करणार करून यात नवीन डिझाइन करण्यात आलेले फ्रंट-रिअर बंपर, हेडलॅम्प, टेललॅम्प पाहायला मिळतील. काही नवीन फिचर देखील त्याच्या केबिनमध्ये समाविष्ट करणे अपेक्षित असून कारण त्याचे आतील भाग कालांतराने जुने होत आहे.

इंजिन

कंपनी या एसयूव्हीच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल करणार नाही. यात पूर्वीप्रमाणेच 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 110hp आणि 131hp पॉवर जनरेट करेल. तसेच, ही SUV 1.5 लीटर डिझेल इंजिनसह येत असून, जी 117hp पॉवर जनरेट करते. ही कंपनी एएमटी ऐवजी टॉर्क-कन्व्हर्टर वापरू शकते, तरीही ट्रान्समिशन समान राहणे अपेक्षित आहे.

कधी होणार लाँच

अजूनही कंपनीने Mahindra XUV300 फेसलिफ्टच्या लॉन्चबद्दल कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही, ती पुढच्या वर्षी बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. लाँच झाल्यानंतर बाजारात ही SUV प्रामुख्याने Tata Nexon, Hyundai Venue आणि Kia Sonnet सारख्या कारला टक्कर असते. सध्याच्या मॉडेलची किंमत 8.42 लाख रुपयांपासून सुरू होते. फेसलिफ्ट मॉडेलमधील नवीन अपडेटनंतर किमतीत वाढ करण्याची शक्यता असते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts